आहाराची बाराखडी

सुपर हिरॊज घडवताना – सीझन १ – एपिसोड – 3 – आहाराची बाराखडी 

आहाराची बाराखडी – या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत आहाराचे साधे सोपे नियम जे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, जे फक्त आपल्या सुपर हिरोजसाठीच  नाही, तर आपण सर्वांसाठी उपयोगी आहेत. काय आहेत हे नियम? आपले आजी आजोबा सांगायचे तेच आहेत, फक्त आपण विसरले आहोत. 

जेवताना पाणी घोट घोट का प्यावे? जेवल्यानंतर खूप पाणी का पिऊ नये?  जेवल्यानंतर लगेच झोपू का नये? शारीरिक कष्टाची कामे का करू नयेत?

मिताहारच का करावा? विरुद्धान्न का खाऊ नये? असे १२ नियम म्हणजेच आहाराची बाराखडी जाणून घेण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना योग्य आहाराच्या सवयी लावण्यासाठी, नक्कीच हा एपिसोड ऐका.

सर्व भूतानी आहारात उपजायते !

म्हणजेच सर्व जिवंत ज्या वस्तू आहेत धर्तीवरच्या म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव आहे त्या सगळ्यांचा जिवंत असण्या मगच एकमेव कारण म्हणजे आहार आहे .

आहाराला ब्रह्म अशीही उपमा दिली आहे.

आहाराप्रती श्रद्धा असावी, आदर असावा , आहाराला प्रत्यक्ष देवाची उपमा देतात याचा अर्थ तुम्ही करणं देखील येथे अपेक्षित आहे .

योग्य आहाराने केवळ शरीराचीच नाही तर आत्म्याची सुद्धा शुद्धी होते .

आहाराने तुमच्या शरीर मधेच नाहीतर तुमच्या मनामध्ये तुमच्या फीलिंग्स चे पोषण सुद्धा आहारामध्ये होत असते.

आहाराबद्दल अशीच भरपूर माहिती आपण या एपिसोड मध्ये जाणून घेन्या साठी हा एपिसोड नक्कीच ऐका.