संताजी परिचय

वाचनाचे महत्त्व सागंणारा श्लोक. … वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्यं शीलरक्षकम्।वार्धक्ये दु:खहरणं हितं सद्ग्रन्थवाचनम्।। बालपणी वाचन आनंद देणारे असते. तरुणपणी चारित्र्याचे रक्षण करणारे असते. वृद्धपणी दुःख दूर करणारे असते. चांगल्या ग्रंथांचे वाचन नेहमी हितकारक असते. श्र्लोक … अगदी योग्य वेळी मिळाला…ज्यावेळी काका विधातें सारख्या सिध्दहस्त, अभ्यासू, संशोधक वृत्तीने केलेलं लिखाण स्वहस्ते.. आपल्याला सप्रेम भेट स्वरुपात देतात… […]

देवयोध्दा – परिचय

देवयोध्दा… त्रिखंडात्मक ऐतिहासिक कादंबरी… कोणत्याही कादंबरी चे वाचन सुरू करत असताना प्रत्येक वाचकांच्या डोक्यात, मनात तसेच डोळ्यांसमोर त्या कादंबरीच्या नायकाविषयी एक साचेबद्ध आकृतीबंधात्मक एक प्रतिमा असतेच असते. त्या त्या प्रतिकात्मक कल्पना डोक्यात ठेवून आपण वाचनारंभ करतो. देवयोध्दा वाचण्यापूर्वी माझ्या पण डोक्यात सामान्यतः या कल्पना होत्याच. आणि त्या कल्पना आतापर्यंतच्या अनुभव, आपल्या लोकांशी झालेले संवाद, अनेकानेक […]