फिरुनी नवी जन्मले मी

Photo Credit : Mid Day १४ एप्रिल २०१४. बी. व्ही.जी. इंडिया कंपनीच्या वार्षिक परिषदेत अरुणिमा ऊर्फ सोनू सिन्हांचं भाषण सुरू झालं. अगदी थेटपणे, अनलंकृत भाषेत त्यांनी आपली हृदयद्रावक आणि चित्तथरारक कहाणी ऐकवली, तेव्हा काही श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले, तर कुणाला अश्रू अनावर झाले. समारोप करताना अरुणिमाजींनी पुढील काव्यपंक्ती उद्धृत केल्या. अभी तो इस बाज […]

वाचन संस्कृतीच्या बैलाला

मायमराठीच्या भवितव्याविषयी चिंतातूर असलेल्या सहोदरांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. साहजिकच या विषयावर सातत्यानं बरंच काही लिहून येतंय आणि विविध व्यासपीठावरून उच्चरवात बोललंही जातंय. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ही समस्या खरोखरच बिकटअसली पाहिजे आणि गेल्या दिवसागणिक ती अधिकाधिक गंभीर होत जात चालली असावी. या ढासळत्या स्थितीची कारणं (आणि साहजिकच उपाय योजनाही) प्रत्येक जण आपापल्यापरीनं […]