काळू-बाळूची कहाणी – तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही श्रींचीच इच्छा आहे

काळू-बाळूची कहाणी हे प्रकरण “तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही श्रींचीच इच्छा आहे” या रवींद्र देसाई यांच्या पुस्तकातून काळू-बाळूची कहाणी काळू आणि बाळू हे दोन मित्र होते. तालुक्याच्या गावात राहत होते. दोघेही शाळेत बरोबर जायचे. कॉलेजमध्ये बरोबर जायचे. नोकरीलाही दोघे एकाच वेळी लागले. कामाच्या जागा वेगवेगळ्या होत्या पण दोघांचा हुद्दा आणि पगार मात्र तसा सारखाच होता. […]

पुस्तक परिचय – वॉल्डनकाठी विचारविहार

“वॉल्डनकाठचा विचार विहार” हेन्री डेव्हिड थोरो. अनुवाद दुर्गा भागवत. जागतिक तापमानातील वाढ हा आजचा बहुचर्चित विषय झाला आहे. या समस्येची कारणे आणि त्याचे परिणाम, याची चर्चा जागतिक व्यासपीठावर पासून बसच्या रांगेपर्यंत सर्वत्र चालूच असते .या समस्येचे काही परिणाम तर गेल्या काही वर्षापासून दिसायला लागलेले आहेत. पृथ्वी व्यापी या समस्येचे कारण एका वाक्यात सांगायचे झाले तर, […]

फिरुनी नवी जन्मले मी

Photo Credit : Mid Day १४ एप्रिल २०१४. बी. व्ही.जी. इंडिया कंपनीच्या वार्षिक परिषदेत अरुणिमा ऊर्फ सोनू सिन्हांचं भाषण सुरू झालं. अगदी थेटपणे, अनलंकृत भाषेत त्यांनी आपली हृदयद्रावक आणि चित्तथरारक कहाणी ऐकवली, तेव्हा काही श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले, तर कुणाला अश्रू अनावर झाले. समारोप करताना अरुणिमाजींनी पुढील काव्यपंक्ती उद्धृत केल्या. अभी तो इस बाज […]

सहोदर

साठोत्तरी मराठी साहित्यातील तीन बिनीचे साहित्यिक आरती प्रभु, ग्रेस आणि जी. ए. कुलकर्णी; दोन कवी आणि एक कथाकार. या तीन आधुनिक सहित्यकर्मींचा शोध आणि वेध घेण्याचा आव्हानात्मक प्रयत्न ‘सहोदर’ या साहित्य समीक्षा ग्रंथामध्ये घेतलेला आहे. डॉ. माधवी वैद्य यांच्या ‘सहोदर’ या ग्रंथाचे नाव खूप बोलके आहे. या तीन साहित्यिकांची वाचक-अभ्यासकांच्या मनातील प्रतिमा कोणती आहे? तर, […]

माझे शिक्षक

माझे शिक्षक दहावीत आमच्या वर्गाला (१० वी तुकडी – क : १९९४) इंग्रजी विषय शिकविण्यासाठी सपकाळ सर (गुलाबराव सपकाळ ), नुकतेच बदली होऊन आलेले. सर वर्गात शिकवायला येण्याच्या आधीच त्यांची किर्ती अन्य शिक्षकांकडुन आमच्या वर्गात पोहोचली होतीच. संपुर्ण वर्ष सरांनी इंग्रजी विषय शिकवला. त्यांची शिकवण्याची पध्दती भारीच. एरव्ही इंग्रजीचा तास तो ही धड्यांचा म्हंटला की […]

संताजी परिचय

वाचनाचे महत्त्व सागंणारा श्लोक. … वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्यं शीलरक्षकम्।वार्धक्ये दु:खहरणं हितं सद्ग्रन्थवाचनम्।। बालपणी वाचन आनंद देणारे असते. तरुणपणी चारित्र्याचे रक्षण करणारे असते. वृद्धपणी दुःख दूर करणारे असते. चांगल्या ग्रंथांचे वाचन नेहमी हितकारक असते. श्र्लोक … अगदी योग्य वेळी मिळाला…ज्यावेळी काका विधातें सारख्या सिध्दहस्त, अभ्यासू, संशोधक वृत्तीने केलेलं लिखाण स्वहस्ते.. आपल्याला सप्रेम भेट स्वरुपात देतात… […]

देवयोध्दा – परिचय

देवयोध्दा… त्रिखंडात्मक ऐतिहासिक कादंबरी… कोणत्याही कादंबरी चे वाचन सुरू करत असताना प्रत्येक वाचकांच्या डोक्यात, मनात तसेच डोळ्यांसमोर त्या कादंबरीच्या नायकाविषयी एक साचेबद्ध आकृतीबंधात्मक एक प्रतिमा असतेच असते. त्या त्या प्रतिकात्मक कल्पना डोक्यात ठेवून आपण वाचनारंभ करतो. देवयोध्दा वाचण्यापूर्वी माझ्या पण डोक्यात सामान्यतः या कल्पना होत्याच. आणि त्या कल्पना आतापर्यंतच्या अनुभव, आपल्या लोकांशी झालेले संवाद, अनेकानेक […]

मून टाइम

पुस्तक परिचय पुस्तक – मून टाइम लेखिका – गीता बोरा प्रकार – माहितीपर. पाळी, ऋतुस्त्राव याबद्दल शास्त्रोक्त माहिती देणारी, हि एक चित्रकथा आहे. वय वर्षे ८ ते १८ पर्यंतच्या मुलीं आणि त्यांच्या पालकांसाठी हे पुस्तक आहे. प्रकाशक – Spherule Foundation साधारणपणे, वय वर्षे ८ ते १६ पर्यंत, मुलींच्या शरीराच्या वाढी प्रमाणे, त्यांना पाळी सुरु होऊ […]

उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स

वैद्य रुपाली पानसे यांनी लिहिलेले सुंदर पुस्तक .पोट, पचन क्रिया , पोटाला कधी आणि काय द्यावं याचं सोप्या भाषेत केलेले विवेचन.आपल्याला आजी , आई कडून कशा बरोबर काय खावं , काय खाऊ नये याची माहिती आलेली असते.पण ते तसं का खाऊ नये , त्याचे काय परिणाम होतात हे रुपाली यांनी भरपूर उदाहरणं देऊन सांगितलं आहे […]

वाचन संस्कृतीच्या बैलाला

मायमराठीच्या भवितव्याविषयी चिंतातूर असलेल्या सहोदरांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. साहजिकच या विषयावर सातत्यानं बरंच काही लिहून येतंय आणि विविध व्यासपीठावरून उच्चरवात बोललंही जातंय. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ही समस्या खरोखरच बिकटअसली पाहिजे आणि गेल्या दिवसागणिक ती अधिकाधिक गंभीर होत जात चालली असावी. या ढासळत्या स्थितीची कारणं (आणि साहजिकच उपाय योजनाही) प्रत्येक जण आपापल्यापरीनं […]

उदरस्थ

डॉक्टर रूपाली पानसें यांनी हे पुस्तक लिहिले आहे. रसिक आंतरभारती या संस्थे ने प्रकाशित केले आहे. पुस्तकाचा विषय आहारशैली आणि आरोग्य या प्रकारात मोडतो.  वैद्य रुपाली पानसे यांनी, पुणे विद्यापीठाच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून BAMS केले आहे. गेली बरेच वर्ष, त्या आयुर्वेद आणि पंचकर्म याद्वारे रुग्णसेवा करीत आहेत. पुणे विद्यापीठामधे एक आहारशास्त्राचा Post – Graduate कोर्स […]

‘द सायन्स ऑफ गेटिंग रिच..’

माझे आवडते पुस्तक…‘द सायन्स ऑफ गेटिंग रिच..’ पुस्तकाचे एक अनोखे विश्व असते..पुस्तके नेहमीच जगण्याला दिशा देत असतात..जगण्याला नवा आयाम देतात.. काही पुस्तके तर अक्षरशः वेड लावतात..आपल्याला दीपस्तंभ ठरलेले पुस्तक इतरांनीही वाचावे आणि त्यांच्या आयुष्यातही बदल व्हावा असे आपल्याला मनापासून वाटते..मग आपण त्यांना आवर्जून ते पुस्तक वाचायला सांगतो..तसे सांगण्यात अथवा ते पुस्तक भेट देण्यात एक आगळावेगळा […]

बाईपणाच्या गोष्टी

माझे मनोगत..   लेखक हा भावनांशी जखडलेला माणूस असतो आणि मानवी भावभावनांचा गुंता त्याला आपल्या लेखणीद्वारे मोकळा करायचा असतो..शब्दांच्या साहाय्याने जेव्हा गुंता मोकळा मोकळा होत जातो तेव्हा त्या निर्मितीला आपण साहित्य असे संबोधतो.साहित्याची बीजे त्याला आजूबाजूच्या वातावरणातून मिळत असतात..काही प्रसंग असे असतात की जे काळजाला भिडतात आणि मग लेखणीतून झरझर उतरतात. माझ्या प्रासंगिक सदरलेखनाला महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक […]