‘बा’ चं पात्र बापूंच्या छायेमध्ये विकसित झालंय. बा आणि मुलांचं ठराविक काळानंतर एका जागेहून दुसऱ्या जागेत विस्थपित होणं. आधी देशामध्ये आणि नंतर परदेशात, तिथंसुद्धा जेलमध्ये आणि नंतर देशातल्या जेलमध्ये. याच काळात मुलं त्यांच्यापासून हळूहळू दूर होत गेली. पती आणि मुलं हीच स्त्री ची ओळख असते. ‘बा’ ची जवाबदारी अनेक ठिकाणी वाटलेली होती. आश्रम, मुलं, आश्रमवासी, स्वतः बापूसारखा पती, स्वतःचे निर्णय आणि शेवटी पतीचा राजकीय वारसा, बा या सगळ्यांमध्ये वाटली गेली होती. मोठ्या मुलाचा विक्षिप्त स्वभाव आणि आईवडिलांपासून त्याचं दुरावत जाणं हि सर्वात मोठी चिघळलेली जखम होती. या सर्वांमुळं ‘बा’ मोडून पडली, पण झुंजणं कमी झालं नाही. त्या देशासाठी लढल्या आणि कुटुंबाच्या आत्मसन्मानासाठीपण लढल्या. काही प्रसंग असेही आले, त्यांनी देशापुढं पतीचीही पर्वा केली नाही. ‘बा’ ला स्वतःविरुद्ध लढावं लागलं.
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging