बयो - कळपातली एखादी मेंढी सुटून आजूबाजूला हिंडायला लागते तेंव्हा तिचा उद्देश मेंढपाळाशी बंड करण्याचाच असतो असे नाही. तिची इच्छा फक्त वाटेवरून जाताना डोळ्यांच्या दोन्ही कोपर्यातून जे जे काही दिसतंय ते सगळं उपभोगायच एवढीच असू शकते. पण मेंढपाळ कधी ती मेंढी हरवून जाइल आणि जीव धोक्यात घालेल या काळजीपोटी कधी तिच्यापासून मिळणारं आपलं उत्पन्न कमी होईल या भीतीनी आणि बरेचदा केवळ वडलांनी हाकायला सांगितलंय म्हणून तिच्यावर काठी उगारत असतो. कारण सरते शेवटी तोही एका कळपाचाच मेंबर असतो. असाच कळपातून फुटलेला “भास्कर” आपल्याला हृषीकेश पाळंदे यांच्या “बयो” या नव्या कादंबरीत भेटतो. ही कादंबरी अर्पण पत्रिकेतच विषयाला हात घालते. अस्सल कोकणी तांबड्या मातीतल्या या गोष्टीचा विषय मात्र खूप वैश्विक आहे. विचार करायची खोड असलेल्या प्रत्येकांनी ही कादंबरी नक्कीच वाचायला हवी!
सहज ओघवत्या शैलीत आजच्या तरुणापुढचे मूलभूत आणि मौलिक प्रश्न मांडणारी ही कादंबरी अगदी आवर्जून वाचा!!
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan) Author : ऋषिकेश पाळंदे (Hrishikesh Palande) Binding : Paperback ISBN No : 9788187549796 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 270gms Width : 20.5 Height : 13.5 Length : 1 Edition : 1 Pages : 255
Rs. 240.00 Rs. 216.00
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includespackaging