देवयोध्दा – परिचय

WhatsApp Image 2021-05-27 at 9.46.57 PM

देवयोध्दा…
त्रिखंडात्मक ऐतिहासिक कादंबरी…

कोणत्याही कादंबरी चे वाचन सुरू करत असताना प्रत्येक वाचकांच्या डोक्यात, मनात तसेच डोळ्यांसमोर त्या कादंबरीच्या नायकाविषयी एक साचेबद्ध आकृतीबंधात्मक एक प्रतिमा असतेच असते. त्या त्या प्रतिकात्मक कल्पना डोक्यात ठेवून आपण वाचनारंभ करतो.
देवयोध्दा वाचण्यापूर्वी माझ्या पण डोक्यात सामान्यतः या कल्पना होत्याच. आणि त्या कल्पना आतापर्यंतच्या अनुभव, आपल्या लोकांशी झालेले संवाद, अनेकानेक प्रवाद, काही वास्तविकतेच्या चौकटीत न बसणारे, काही बसणारे अशी बहुमतमतांतरे आणि या सर्वाचा बराचसा गाळ या बाजीराव बल्लाळ या व्यक्तिरेखेवर होताच.
तसाच तो छत्रपती शाहू महाराज या सन्माननीय व्यक्तीरेखेविषयी पण होताच. कुॅंवर मस्तानींच्या बद्दल तर न बोललेलेच बरं…!!!

काका विधाते यांच्या लिखाणात एक वैशिष्ट्य परतपरत जाणवते ते या कादंबरीत पण जाणवलं ते म्हणजे काका लिखाण करताना कल्पनास्वातंत्र्य घेऊन, नुसतेच कल्पनाविष्कार मांडत नाहीत. त्या कलाकृती साठी त्यांनी घेतलेले कष्ट , त्या त्या प्रसंगानुरूप प्रत्येक बाबींचा त्यांनी केलेला सखोल, सर्वसमावेशक अभ्यास आणि वास्तवाचे भान ठेवून सत्यकथनाची, सत्य मांडण्याची, त्यांची तळमळ पानोपानी जाणवत राहते.

उदाहरणं च द्यायची झाली तर खुपचं देता येतील… तरीही थोडक्यात सांगायचे तर सरंजामी व्यवस्था म्हणजे सरंजामशाही आणि वतनदारी यातील मुलभूत फरक, बुंदेलखंड आणि बुंदेला राजपूतांच्या रितीरिवाजांची सखोल विश्लेषणं, त्याकाळच्या चलनात असलेल्या प्रत्येक चलनाविषयींची माहिती, संगिता मधलं स्वरज्ञान, आणि नृत्यकला विषयक तालज्ञान…
राजा छत्रसाल आणि परिवारातील सदस्य यांची मानसिकता, छत्रपती शाहू महाराजांनी साम्राज्य विस्तारासाठी केलेलं राजकारण, निजाम, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि दिल्ली दरबारची तत्कालीन मानसिकता आणि वास्तव, छत्रपती शाहू महाराज आणि कारभारी यातील अंतर्गत राजकारण, प्रणामी पंथ आणि त्यांची प्रणाली…,
कुॅंवर मस्तानींच्यावर झालेल्या अन्यायांची, त्यांच्या बद्दल जाणिवपूर्वक पसरविण्यात आलेल्या गैरसमजुती…
अशी अनेकानेक उदाहरणे देता येतील.
बाजीराव नायक म्हणून मांडत असतानाच, त्या व्यक्तीरेखेला न्याय्य देतानाच, आजकालच्या कादंबरीकारांनी नायकाचं उद्दातीकरण मात्र मा. काका विधाते यांनी कटाक्षाने टाळले पण आहे.
कोणाचं उदात्तीकरण नाही अन्य कोणाचंही खच्चीकरण नाही.

तत्कालीन ऐतिहासिक सत्याच्या जास्तीत जास्त जवळ पोचायचा एक अभिनव प्रयोग या कादंबरीत केलेला आहे. आणि म्हणूनच ही त्रिखंडात्मक कांदबरी पुनः पुन्हा वाचनीय ठरते.
प्रत्येक इतिहासप्रेमी, संशोधक वाचकांच्या संग्रही असावा असा हा ग्रंथराज आपण नक्कीच एकदा तरी वाचायलाच हवा…!!!

🌹🙏🏻🌹
इंद्रजितसिंह वि घोरपडे (हिंदुराव) गजेंद्रगडकर

74610cookie-checkदेवयोध्दा – परिचय
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.