आत्ताच आपली प्रत मिळवा !!!

Hemu Bhargav
राजाधिराज पृथ्वीराज चौहानांनंतर तब्बल ३६५ वर्षांनी दिल्ली जिंकून हिदुस्थानचं सम्राटपद भूषवणारा एकमेव हिंदू पुरुष म्हणजे हेमू. असं धैर्य, असं कर्तृत्व त्याआधी वा त्यानंतर एकाही हिंदू वीराला जमलं नाही. हिंदुस्थानच्या राजकीय क्षितिजावर धूमकेतूप्रमाणे अकस्मात उगवून लुप्त झालेलं एक वादळी व्यक्तिमत्त्व.
मोगल इतिहासकारांच्या पक्षपाती आणि विषारी लिखाणानं ज्याची उज्ज्वल कीर्ती कलंकित झाली तो अखेरचा हिंदू सम्राट हेमू उर्फ हेमचंद्र विक्रमादित्य याच्या वास्तव जीवनाचा वेध घेणारी ऐतिहासिक कादंबरी.
हेमूच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये :
अ) भव्य असा राजकीय, सामाजिक वा लष्करी वारसा नसताना केवळ स्वतःच्या गुणांच्या जोरावर हेमूने इतिहासात आपलं वैशिष्ट्यपूर्ण, अढळ स्थान निर्माण केलं. राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्याचं व्यक्तिमत्त्व वाटतं. या बाबतीत शेरशाहच्या जीवनाशीच त्याची तुलना होऊ शकेल. घोड्यांचा व्यापारी असलेल्या सामान्य इब्राहिमचा हा नातू जसा अत्यंत निकृष्ट स्थितीतून प्रयत्न आणि पुरुषार्थाच्या बळावर हिंदुस्थानच्या सुलतानपदी आरूढ झाला, तसाच हेमूही केवळ वैयक्तिक धैर्य, साहस आणि पराक्रमाच्या बळावर अल्पकाळ का होईना, भारताचा सम्राट बनला.
ब) हिंदूंना पूर्णपणे प्रतिकूल असलेल्या त्या काळात इतक्या उच्चस्थानी पोहचण्यासाठी हेमूला अविरत झुंजावं लागलं. पदोपदी त्याच्यातल्या गुणांची कसोटी लागली आणि त्यात तो यशस्वी ठरला. ज्या उच्च स्थानी तो जाऊन पोहचला, तिथपर्यंत कोणा अन्य हिंदूला पोहचता आलं नाही. अगदी जाणीवपूर्वक ही गोष्ट त्याने घडवून आणली. अफगाणांची प्रतिकूल असलेली मनेही त्याने जिंकली.
क) तिसरी बाब ही की, राज्यातल्या बंडखोरांचा बीमोड करताना बयाणा ते खवासपूर टांडापर्यंत शेकडो कोस पसरलेल्या रणभूमीत अवजड हत्तींचा सरंजाम सोबत घेऊन ज्या वेगाने तो वावरला; त्याचा तो वेग, लष्करी हालचाली मती गुंग करून टाकणाऱ्या आहेत. सैन्याच्या इतक्या गतिमान हालचाली करणारा त्याच्यासारखा कुशल, तडफदार सेनापती त्या काळी दुसरा कोणी झाला नाही. लढाया लढताना प्रत्येक वेळी निरनिराळे डावपेच त्याने लढवले. शत्रूला गाफिल ठेवून अचानक आक्रमणे केली आणि प्रत्येक लढाईत विजय खेचून आणला. यावरून रणांगणाची त्याला असलेली जाण, लष्करी डावपेचातली कुशलता आणि सेनापती म्हणून त्याच्या अंगी असलेली योग्यता दिसून येते.
ड) चौथा महत्त्वाचा मुद्दा असा की, केवळ लष्करी बाबीतच नव्हे, दिवाणी आणि महसुली बाबीतही आपलं नैपुण्य त्याने दाखवून दिलं. त्याला व्यापाराची चांगली माहिती होती. दिल्लीच्या बाजाराचा शहाना-ए-मंडी म्हणून उत्तम कारभार त्याने केला. इस्लामशहाने पंजाबमध्ये अजम हुमायूँ आणि गक्करांविरुद्ध ज्या दीर्घकालीन मोहिमा केल्या, त्यावेळी लष्कराला रसद पुरवठा करण्याचं काम चोखपणे बजावलं. दरोगा-ई-डाकचौकी, वकील-ई-दार अशा महत्त्वाच्या पदांवर त्याच्या नेमणुका झाल्या. तिथेही आपल्या कर्तबगारीचा ठसा त्याने उमटवला. आदिलशाहा सूरच्या काळात तर तो साम्राज्याचं सर्वोच्च पद असलेल्या पंतप्रधानपदी पोहचला. प्रशासकीय कौशल्य असल्याशिवाय या जबाबदारीच्या पदांवर त्याच्या नेमणुका होणं शक्यच नव्हतं. यातून त्याची बुद्धिमत्ता, क्षमता, धन्याएकी असलेली निष्ठा दिसते. प्रत्येक पदाला त्याने या दिला. त्याच्या अंतानंतर दिल्ली, आग्रा आणि आसपासच्या प्रांतात त्याने ज्या चौधरी आणि महाजनांच्या नेमणुका केल्या, त्या अकबरालाही कायम ठेवाव्या लागल्या. यावरून हेमूचा प्रशासकीय अनुभव आणि जाण अधोरेखित होते. शेरशाहाचं महसुली, प्रशासकीय कौशल्य हेमूमध्ये पुरेपूर उतरलेलं होतं.

 

वाचकांचा अभिप्राय

सर्वांनी अवश्य वाचा हे पुस्तक.. जबरदस्त पुस्तक आहे 950 पानी.

Aniket Bhute

भार्गव हे शीर्षक असलेले एक पुस्तक आमच्या छोट्याशा गावातल्या वाचनालयातून काही महिन्यापूर्वी वाचनात आले. एक बर्‍यापैकी ऐतिहासिक कादंबरी. कथेतील विश्वासार्हता, कादंबरीचे ऐतिहासिक मूल्य काय यावर जाणकारच प्रकाश टाकू शकतील. पण रसनिर्मितीसाठी भावनिक अभिनिवेशाचा मोह टाळण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. त्यामुळे कथा इतिहासापासून दूर गेलेली नसावी. ऐतिहासिक कादंबरी वाचतांना खटकणारे मुद्दे इथे मला अजिबात जाणवले नाहीत. ऐतिहासिक क्लिष्टता टाळून सोप्या भाषेत विविध घटनांतून रंजक इतिहासकथन असल्यामुळे मला तरी वाचायला कंटाळा आला नाही. ‘मध्ययुगीन भारतातला नेपोलियन’ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य असे गौरवोद्गार आपले काही इतिहासकार काढतात. (नेपोलियन श्रेष्ठ की हेमू श्रेष्ठ हा वाद मी येथे काढत नाही) अबुल फजल अकबराचा स्तुतीपाठक होता हे आपण समजू शकतो. आपले देशी इतिहासकार, आपले स्वतःला विद्वान म्हणून समाजात मिरवणारे मराठी शालेय पाठ्यपुस्तकलेखककार देखील अकबराचे गोडवे गातात आणि सम्राट हेमू विक्रमादित्याचा साधा उल्लेख देखील करीत नाहीत याची खंत वाटली म्हणून हा पुस्तकपरिचयाचा लेखनप्रपंच.

सुधीर कांदळकर

काका विधाते यांच्या कादंबऱ्या :

१. रक्कासा:१८५७ साली भारतीय स्वातंत्र्ययुद्धात आत्मार्पण केलेल्वी कधील अझीजान नावाच्या नर्तकीची कथा सांगणारी कादंबरी

२. पारध:ओरिसा येथील खुर्द्याच्या राजघराण्यातील राजा रामचंद्रदेव आणि बिहार ओरिसाच्या सुभेदारकन्या रझीया या दोघांच्या प्रेमकथेचा आणि त्यातून उद्भवलेल्या      संघर्षाचा वेध घेणारी कादंबरी

३. दर्यादिल दारा शिकोह (तिसरी आवृत्ती):औरंगजेबाचा थोरला भाऊ दारा शिकोह हा एक विद्याव्यासंगी, बहुश्रुत आणि उदार विचारांचा माणूस होता.धर्मवेड्या    औरंगजेबाच्या क्रूर तलवारीला बळी पडलेला हा सर्वस्पर्शी शांतिदूत!

४. संताजी (पाचवी आवृत्ती) संताजी घोरपडे आणि मराठ्यांचा तेजस्वी स्वातंत्र्यलढा याचा इतिहास या कादंबरीत विस्तृतपणे मांडलेला आहे.

५. दुर्योधन (पाचवी आवृत्ती) ही कादंबरी महाभारताचा पट उलगडून दाखवणारी आहे.

काका विधाते यांची इतर दर्जेदार पुस्तके

आत्ताच आपली प्रत मिळवा !!!