मून टाइम

MoonTime1

पुस्तक परिचय पुस्तक – मून टाइम लेखिका – गीता बोरा प्रकार – माहितीपर. पाळी, ऋतुस्त्राव याबद्दल शास्त्रोक्त माहिती देणारी, हि एक चित्रकथा आहे. वय वर्षे ८ ते १८ पर्यंतच्या मुलीं आणि त्यांच्या पालकांसाठी हे पुस्तक आहे. प्रकाशक – Spherule Foundation

साधारणपणे, वय वर्षे ८ ते १६ पर्यंत, मुलींच्या शरीराच्या वाढी प्रमाणे, त्यांना पाळी सुरु होऊ शकते. या वयामध्ये, मुलींच्या शरीरामध्ये, बरेच बदल घडत असतात, हार्मोनल changes होत असतात. या काळात पालक म्हणून, आपण, आपल्या पाल्यांना, वैद्यकीय दृष्ट्या अचूक माहित देणे, त्यांच्या सर्व प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे देणे, हे महत्वाचे असते. हा विषय अजूनही, आपल्या समाजात, वर्ज्य आहे, किंवा openly बोलला जात नाही. या विषयावर चर्चा करणे बरेच जण टाळतात. परंतु जसा आपण श्वास घेतो, रोज आंघोळ करतो, वॉशरूमला जातो, अगदी त्याचप्रमाणे, मुलींमध्ये दर महिन्याला होणारी, हि एक नेसर्गिक प्रक्रिया आहे. समाजामध्ये हा विषय Taboo असल्यामुळे, खूप जणांना, पाळीबद्दल माहिती नसते आणि त्यामधे बऱ्याच आया देखील आहेत. जर आयांना ह्या गोष्ट्टी, त्यामागची शास्त्रोक्त कारणे, होणारे त्रास, केंव्हा डॉक्टरकडे जायचे, कुठले hygiene प्रॉडक्ट्स वापरायचे, स्वच्छता कशी राखायची हे माहित नसेल, तर, अश्या मुलींना शास्त्रोक्त माहिती कशी मिळणार? म्हणून हे पुस्तक लिहिलेले आहे. हे आईने आणि मुलीने दोघीनी वाचणे अपेक्षित आहे. तुमची मुलगी लहान असेल तर तिच्याबरोबर हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. बऱ्याच आयांना असे वाटते कि, सॅनिटरी पॅड कसे वापरायचे हे मुलींना कळाले, कि त्यांचे काम संपले पण असे नाहीये. मुलींना पाळी का येते, re -productive सिस्टिम काय आहे, पाठ, कंबर का दुखते, मूड स्विंग का होतो, व्यायाम कुठले करावेत, काय खावे , काय खाऊ नये, असे अनेक प्रश्न लहान मुलींना पडलेले प्रश्न असतात. एक आई म्हणून, तुम्ही सुशिक्षित असाल आणि तुम्हाला पाळीचा अनुभव आहे, म्हणून तुम्हाला सर्व माहित आहे, अश्या विचारात आपण असतो. नक्कीच Experience मुळे, आयांना सॅनिटरी पॅड्स वापरण्याबद्दल आणि मंथली cycle बद्दल माहिती असते, पण आपल्याला, याच्या पलीकडे जाऊन, अजून माहिती मुलींना देणे किती महत्वाचे आहे, हे तुम्हाला पुस्तक वाचल्यावर नक्की कळेल.

हे पुस्तक एका कॉमिक च्या स्वरूपात आहे. यामध्ये एका मुलीला अचानक पाळी येते आणि मग तिला एक डॉक्टर मावशी, साध्या सोप्या भाषेत आणि चित्रांद्वारे सर्व माहिती समजावून सांगते. पुस्तकाचे वाचक मुली आहेत, हे लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिले असल्यामुळे, ते कुठेच बोजड होत नाही, इन फॅक्ट, पालक म्हणून, आपल्याला देखील , ते वाचायला अतिशय सोपे आणि इंटरेस्टिंग वाटते. आपल्या समाजामध्ये, पिढ्यानपिढ्या चालत आलेले, बरेच गैर समाज किंवा मिथके पाळीबद्दल आहेत. ऋतुचक्र म्हणजे शाप किंवा अशुद्ध आणि अस्वछ प्रकार आहे, हे असेच एक मिथक. हा विषय देखील लेखिकेने पुस्तकामध्ये ऍड्रेस केला आहे. माझ्या मुलीने आणि मी हे पुस्तक एकत्र वाचले, आणि तिने ते खूप इंटरेस्ट घेऊन वाचले, कारण , तिला माहिती होते कि आपल्याला या गोष्टींची माहिती हवी. तिने नंतर follow up प्रश्न देखील विचारले, ज्याची उत्तरे, मी हे पुस्तक वाचल्यामुळे, सहजपणे देऊ शकले.

बऱ्याच भारतीय , इंग्लंड आणि अमेरिकन डॉक्टर्स च्या चमूने, या पुस्तकावर शिक्कामोर्तब केलेले आहे. या पुस्तकातील, डॉक्टर्सच्या विशेष विभागामध्ये, डॉक्टरांची ओळख आणि आपल्या मुलींसाठी त्यांनी दिलेले अमूल्य सल्ले, याची नोंददेखील केलेली आहे.

गीता बोरा या लेखिका “Spherule Foundation” नावाचा NGO चालवतात, पाळी किंवा ऋतुचक्र या विषयावर, बरेच अवेअरनेस सेशन्स देखील घेतात. त्यांचे अवेअरनेस सेशन्स, बरयाच शाळांमधून, ऑनलाईन आणि पूर्ण भारतामध्ये रिमोट areas मध्ये देखील केले जातात. Spherule फॉउंडेशन ने, स्त्री नावाचा, एक affordable / स्वस्त सॅनिटरी नॅपकिनचा ब्रँड देखील, सुरु केलेला आहे जो गरजू लोकांना स्रियांना विनामूल्य किंवा कमी किमतीत दिला जातो.

पालकांसाठी आणि मुलीसाठी अतिशय आवश्यक, सोपे आणि रोचक पद्धतीने लिहिलेलं हे पुस्तक प्रत्येक आईने आणि मुलीने जरूर वाचावे. आपण, हे पुस्तक, आपल्या मुलीला भेट म्हणून नक्की द्या.

Dwitiya Sonawane

Spherule Foundation – https://spherule.org/ Email: [email protected]

पुस्तक विकत घेण्यासाठी, तुम्ही फोन किंवा व्हाट्स अँप वर द्वारे देखील संपर्क करू शकता: WhatsApp Number : +919623218625

67350cookie-checkमून टाइम
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.