192730cookie-checkAnand Palande 4 Books Set

Anand Palande 4 Books Set

(1 customer review)

१. चढाई उतराई – सह्याद्रीतील घाटवाटांची :
सह्याद्रीतील घाटवाटांवर आजही आधुनिक वाहतुकीचा मागमुसही नाही. अशा अनेक वाटांचा धांडोळा आनंद पाळंदे यांच्या चढाई उतराई या पुस्तकात घेतला आहे. तरुण तरुणींना हे पुस्तक घ्यावे, वाचावे आणि धाडसाच्या अद्भूत दुनियेसाठी सज्ज व्हावे, प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यात पुरेसे मार्गदर्शन आहेच. पण, सात-आठशे मीटर उंच खडतर चढाई-उतराई करण्याचीही तयारी करावयास हवी. महाराष्ट्रातील ४३ ओळखी-अनोळखी घाटांची वर्णने, ३६ अवघड घाटांचे रंगीत भासचित्रे, सोबत त्यामधील जाण्याचे मार्ग, घाटांचे एतिहासिक अवलोकन आणि सह्या्द्रीतील सर्व २२३ घाटवाटा – खिंडी / बारी / पाजा यांची संपुर्ण यादि सह हा सह्यभटक्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक परिपुर्ण ग्रंथ आहे.
पाने: २७२ किंमत: ₹३९०/-

२. डोंगरयात्रेत दिसलेल्या दुर्गवास्तू :
दुर्ग ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. तिथे तट-बुरुज, वाडे-हुडे, देवता, टाक्या, तोफा, शिल्प-स्मारके आहेत. यांच्या सोबतीने घडून गेलेल्या चांगल्या वाईट घटनांचा ठसा तिथे उमटला आहे. या सर्व दुर्गाचे इतिहासकालीन आराखडे फारच कमी उपलब्ध आहेत. फोटोमुळे भूरूप कळते पण वास्तुरचना समजत नाही, मात्र एक आराखडा शंभर शब्दांचे काम करतो. आणि म्हणूनच गडांशी निगडित वास्तूंची नोंद राहावी यासाठी लेखकाने परिश्रमपूर्वक स्वत:ला दिसलेले गडाचे रुप आराखड्यांद्वारे ह्या पुस्तकांत मांडले आहे. तसेच सोबत त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं देखील दिल्या आहेत. महाराष्ट्रातील २८८, गुजरातमधील ६, कर्नाटकातील १ अशा २९५ दुर्गांचे आराखडे ह्या पुस्तकांत उपलब्ध आहे.
पाने: ४८० किंमत: ₹४८०/-

३. पर्वतयात्रा :
हिमालयातील पर्वतयात्रींना हिमालय दर्शन सुसह्य होण्यासाठी हिमालयातील 35 ट्रेक्सची नकाशांसह माहिती देणारे मराठीतील पहिलेच पुस्तक.
पाने: १५४ किंमत: ₹१६०/-

४. डोंगरयात्रा:

लेखक आनंद पाळंदे एक निष्णात गिर्यारोहक आणि निसर्ग प्रेमी आहेत. त्यांनी या डोंगरयात्रा पुस्तकाचे 2 भाग केले आहेत, पहिल्या भागात कातळरोहण, हिमबर्फारोहण यांसारख्या अवघड प्रकारांचीही ओळख करून देतात. गिर्यारोहण आणि गिर्यारोहणाचा एक खेळ म्हणून परिचय आहे. प्रथमोपचार, ट्रेकसाठी साहित्य, संभाव्य धोके आणि निसर्गात असताना विविध ऋतूत पाळले जाणारे काही नियम अशा विविध पैलूंचे ते वर्णन करतात. दुसऱ्या भागात, ते किल्ल्यांचे प्रदेशनिहाय नकाशे, प्रत्येक किल्ल्यावर पाहण्यायोग्य ठिकाणांची माहिती देतात. सह्याद्रीतील किल्ले, सागरी दुर्ग, पर्वतीय प्रदेशातील दुर्ग अशी सूची त्यांनी दिली आहे.
पाने: ४२४ किंमत: ₹३५०/-

1380 Rs

अधिक माहिती

1 review for Anand Palande 4 Books Set

  1. Shailendra gosavi

    I like this book

Add a review

Your email address will not be published.