85290cookie-checkबलुचिस्तानचे मराठा एक शोकांतिका

बलुचिस्तानचे मराठा एक शोकांतिका

(1 customer review)

इस्त्रायल मध्ये ज्याप्रकारे जगभरातील ज्यूंना एकत्रीत करून त्यांचे एक नवीन राष्ट्र तयार करण्यात आले त्याच धर्तीवर बलुचेस्थान मधील बुग्ती मराठा हा जेमतेम दोन लाखांचा समाज भारतात आणून त्यांचे महाराष्टात पुनर्वसन करावे अशी लेखकांची तळमळीची विनंती आहे.
जखम उरी ज्यांच्या होते तेच गीत गती या काव्यपंक्ती नुसार पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील पराभावाची भळभळती जखम बारी करण्यासाठी द्रौपदीने जसे अश्वत्थामाच्या जखमेवर तेल ओतून महाराष्ट्रातील प्रतिशोध घेण्याचा प्रकार संपविण्याचा प्रयत्न केला त्याच पटद्धतीने नंदकुमार येवले यांनी मनातील बुग्ती मराठा समाजासाठी केलेला हा यशस्वी प्रयत्न आहे.

307 Rs

अधिक माहिती

1 review for बलुचिस्तानचे मराठा एक शोकांतिका

  1. Kaushik Lele

    पाकिस्तानातच्या बलुचिस्तानात “बुग्ती मराठा” नावाचा समाज राहतो हे तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही म्हणाल, “मराठा” आणि तेही पाकिस्तानात ! पण हो. हे लोक पूर्वीचे महाराष्ट्रातले आहेत. साधारण अडीचशे वर्षांपासून ते पाकिस्तानात राहत आहेत. पण “राहत आहेत” हा सौम्य शब्द झाला. अडीचशे वर्षांपासून ते नरकयातना भोगत काळ कंठत आहेत असंच म्हणावं लागेल.

    कोण आहेत हे लोक ? विपन्नावस्थेत का आहेत ? ह्याची उत्तरं आणि त्यांची हृदयद्रावक कहाणी मांडणारी ही कादंबरी – “बलुचिस्तानचे मराठे – एक शोकांतिका”

    १७६१ साली झालेले पानिपतचे युद्ध हा मराठी इतिहासातला अविस्मरणीय प्रसंग. महाराष्ट्रातून लक्षावधी सैनिकांनी पानिपतपर्यंत जाऊन अहमदशहा अब्दालीला रोखलं होतं. ह्या युद्धात मराठयांना अपेक्षित विजय मिळाला नाही. धुमश्चक्री झाली. युद्ध अंतिम टप्प्यात असताना, पराभव समोर दिसू लागल्यावर रणांगणातून पळून जाण्यातच शहाणपणा होता. अब्दालीच्या सैन्याने चालवलेल्या शिरकणातून बरेच लोक वाचले पण चाळीस-पन्नास हजार मराठे मात्र अब्दालीच्या तावडीत सापडले. पूर्ण अभिप्राय वाचण्यासाठी हि लिंक वापरा :-
    http://learnmarathiwithkaushik.com/courses/baluchistanche-maratha-ek-shokantika/

Add a review

Your email address will not be published.