85930cookie-checkदिनमहिमा

दिनमहिमा

वर्षभरात जगात काही ना काही प्रसंग, घटना घडत असतात. पुढे त्याचे स्मरण करण्यासाठी सबंधित दिवस त्या नावाने साजरा केला जातो. यात एखाद्या थोर व्यक्तीचा जन्मदिवस, पुण्यतिथी, क्रांतिकारी घटना, परंपरा, संस्कृती या संदर्भात तो दिवस ओळखला जातो.

राज्य, राष्ट्रीय, जागतिक पातळीवर साजऱ्या होणाऱ्या विशेष दिनांचा परिचय रोचना भडकमकर यांनी ‘दिनमहिमा ‘मधून करून दिला आहे. एक जानेवारी हा जागतिक धुम्रपानविरोधी दिन असतो. धुम्रपान केल्यास काय तोटे होतात, कर्करोगाची माहिती, धुम्रपानविरोधी चळवळ आदी माहिती यात दिली आहे.

या प्रमाणे १ जानेवारी ते २४ डिसेंबर या काळात येणाऱ्या विशेष दिनांचा महिमा सांगितला आहे. महिला मुक्ती दिन, मुलभूत कर्तव्यपालन दिन, जागतिक घर दिन, राष्ट्रीय मतदार दिन , मातृभाषा दिनाचे महत्व सांगितले आहे.

महिला आरोग्य दिन, लष्कर दिन, अग्निशामक दल दिन, हास्य दिन, जागतिक संग्रहालय दिन, भूमिपुत्र दिन, मृत्युदंड निषेध दिन, काटकसर दिन, अतिस्थूलता निवारण दिन, चहा दिन आदी वर्षभरातील दिनवैशिष्ट्ये यात टिपली आहेत. त्या अनुषंगाने यातून दिलेली रोचक माहिती ज्ञानात भर टाकते.

225 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दिनमहिमा”

Your email address will not be published.