24230cookie-checkफिरूनी नवी जन्मले मी

फिरूनी नवी जन्मले मी

(3 customer reviews)

अरुणिमा सिन्हाची प्रस्तुत आत्मकथा कल्पित वाटावी अशी एक चित्तथरारक कहाणी आहे. हलाखीत असलेल्या कुटुंबातील ही पितृहीन युवती औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबलच्या जागेसाठी मुलाखतीला म्हणून रेल्वेनं लखनौहून दिल्लीला जायला निघते. खचाखच भरलेल्या अनारक्षित डब्यात ऐन मध्यरात्री गळ्यातल्या सोन्याची चेन हिसकावणाऱ्या गुंडांशी झटापट होऊन ती बाहेर अंधारात फेकली जाते.तिच्या दुर्दैवानं त्याच वेळी उलट दिशेनं येणाऱ्या गाडीखाली येऊन ती आपला पाय गमावते. यातून ती कशीबशी बचावते. त्याही हतबल, अपंग स्थितीत आपल्या कृत्रिम पायानिशी हिमालयचं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न मनात बाळगते, आणि नंतर अवघ्या दोन वर्षात ते खरोखरच गाठून तिथवर पोचणारी जगातली पहिली अपंग स्त्री म्हणून ख्यात होती.

150 Rs

अधिक माहिती

Additional information

Weight 0.176 kg
Author

Arunima Sinha

Translator

Prabhakar(Bapu) Karandikar

ISBN No

9.78819E+12

Edition

2nd/2016 ? 1st/2015

Pages

144

Language

?????

Binding

Paperpack

3 reviews for फिरूनी नवी जन्मले मी

 1. Mr. Meghshyam Wagulde

  फिरूनी नवी जन्मले मी. हे पुस्तक मी covid-19 ग्रस्त असताना वाचले. पुस्तक अतिशय सुंदर वाचनीय आहे. मि चीनमधून आलेल्या पाहुण्याने जामच घाबरलो होतो व याच काळात या पुस्तकाने मला ऊर्जा दिली. मला एक नवीन उर्मी मिळाली. प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे असा माझा आग्रह आहे.
  आपण चिकाटी ठेवली तर काहीही साध्य करू शकतो हे अरुणिमा ने दाखवून दिले.
  प्रत्येकाच्याा आयुष्या संकट ही वेगवेगळ्या स्वरूपात येऊ शकतात. पान ते ३३ वरील चार वाक्य नवीन दृष्टीकोन दिला ती वाक्य असेच
  “शेली नावाच्या एका कवीनं म्हटलं आहे की अनेकदा आपण काट्याकुट्यांवर पडतो आणि रक्तबंबाळ होतो. पण त्या जीवघेण्या संकटाात बुडून जाण्याऐवजी पूर्वीपेक्षाही समर्थ होऊन बाहेर येतो.”
  आपण मनाने पक्केे असलो व निर्णय. कायम असला तर आपण पण हवंंते साध्य करू शकतो.
  अरूनिमा ने ज साध्य केले ते तिच्याच शब्दाात ऐकलं पाहिजे, प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे असा माझा आग्रह आहे. अरुशिमा ने दाखवून दिले की ति शरीराने अपंग असेल पण मनाने व कृती न सबळ आहे.
  पुस्तकाची भाषा शैली उत्तम आहे. ती तुम्हाला नक्कीच खीळवून ठेवेल.
  मी हे पुस्तक वाचून झाल्यावर मी रोज सायकलिंग चा सराव सुरू केला व ठाणे ते पुणे असा सायकल प्रवास चे स्वप्न पूर्ण करणार.
  Meghashyam Wagulde

 2. Sachin waykule

  खूप छान उपक्रम आहे , अभिनंदन अन कौतुक

 3. Nagaraj Borase

  “फिरून नवी जन्मले मी” हे पुस्तक अरूणिमा सिन्हा हिची खरी आणि सत्य घटना आहे. रेल्वेमध्ये गुंडांनी तिची सोनसाखळी घेण्यासाठी तिला चालत्या गाडीतुन ढकलून देतात, तिचा डावा पाय गुडघ्यापासुन तुटतो व ती दोन ट्रॅकच्यामध्ये रात्रभर पडुन राहते, गाड्या तिच्या अंगावरून जातात, तिला उठायची ताकद नसते. ती मदतीसाठी याचना करते, पण तिचा आवाज अशक्तपणामुळे जोरात निघत नाही. शेवटी अंधार्यात गाववाले तिला उचलुन हातगाडीवर तिला ॲडमिट करतात, पण हॅास्पिटलमध्ये ॲनेस्थिया देणारा नसतो, ती डॅाक्टरांना ॲनस्थेया बिगर तिचा पाय तिच्या इच्छेनुसार कापतात व डॅाक्टर तिच्या धैर्याचे कौतुक करतात. तिचे मेहुणे( साहेब)पेपरला ही बातमी देतात व तिची बातमी सर्व चॅनलवाल्यांना कळते व तिची बातमी सर्वकडे म्हणजे रेल्वे डीपार्टमेंटला कळते व ते तिला वैद्यकीय मदत करतात. भारतात ही बातमी पसरते. तिला हॅास्पीटलमध्ये अतिमहत्वाच्या व्यक्तीसारखी ट्रीटमेंट मिळते. हॅास्पिटलमध्ये राजकिय व्यक्ती सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहनसिंग भेटायला येऊ लागले.क्रिडामंत्री मक्वाना तिला भेटायला आले. ती स्कुलमध्ये खेळात ती प्रथम यायची. क्रिडामंत्री मक्वानांनी तिला विमानाने दिल्लीला एम्समध्ये भरती करतात, तिथे कृत्रिम पाय बसवुन देतात. तिला देशातून अनेक संघटनाकडुन मदतीचा ओघ सुरू झाला.तिच्या मेहुणा(साहेब) तिला एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न दाखवतात. ती ते खरे करण्याचे ठरवते. ती टाटा कंपनीतर्फे एक महीन्याचा ट्रॅकीगचा कोर्स पुर्ण करते व ती टाटातर्फे एव्हरेस्ट कॅम्पमध्ये भाग घेते व ती एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग मुलगी म्हणुन तिला मान मिळतो . तिच्या मेहुण्याचे (साहेबाचे) स्वप्न खरे ठरते. तिला राष्ट्रपती प्रतिभा ताईंच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळतो. दोन्ही पाय असणार्या मुलीला एव्हरेस्ट सर करता येणार नाही ते काम एका अपंग मुलीने करून दाखविले. तिला अपंग मुलींच्या खेळण्यासाठी इंटरनॅशनल स्टेडीयम करायचे आहे. त्यासाठी तिला सरकारकडुन मोठी जागा मिळाली आहे. तिला बर्याच संस्थांकडुन मदत मिळत आहे. हे स्वप्न तिला पुर्ण करायचे आहे. अशी ही तिची शौर्यकथा आहे, तिचा देशाला अभिमान आहे

Add a review

Your email address will not be published.