86510cookie-checkगावातली जीवनदृश्यं

गावातली जीवनदृश्यं

‘गावातली जीवनदृश्यं’ – नोबेल आणि बुकर पुरस्कार विजेते लेखक जे. एम. कुट्सी यांच्या तीन आत्मचरित्रपर कादंबऱ्यांचा संकलित खंड-(‘बालपण’, ‘तारुण्य’ आणि ‘उन्हाळा’)
ओरिजिनल इंग्लिश पुस्तक – Scenes from Provincial Life (BOYHOOD, YOUTH, SUMMERTIME ३ literary fictions in १ बुक )
* बालपण * : पुस्तकाची सुरुवात १९४०च्या दशकामधल्या दक्षिण आफ्रिकेतल्या एका लहान शहरात किंवा मोठ्या गावात होते. घरामध्ये वडिलांसोबत अवघडलेले संबंध असणारा आणि आईच्या बिनशर्त प्रेमाने गुदमरणारा एक मुलगा यात आहे. शाळेमध्ये समोर येणाऱ्या प्रत्येक चाचणीत तो पास होतो, पण त्याच्या सहाध्यायींबाबत, विशेषतः उग्र आफ्रिकनारांबाबत तो दक्ष राहतो.
* तारुण्य * : केप टाऊनमध्ये गणिताचा विद्यार्थी असणारा तो स्वतःच्या मातृभूमीपासून सुटका करून घेण्याच्या तयारीत असतो. युरोपात जाऊन स्वतःला कलावंत म्हणून घडवण्याची त्याची मनिषा असते. परंतु, लंडनमध्ये आल्यावर वास्तव त्याला खच्ची करतं: कम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून तो परिश्रम घेतो, अनेक दमट, उदास खोल्यांमध्ये राहतो, आणि एकाकीपणा नि कंटाळा त्याला वारंवार सतावत राहतात. तो स्वभावतःच तिऱ्हाईत आहे. तिथे त्याला लिहिणं शक्य होत नाही.
* उन्हाळा * : अनेक दशकांनी एक इंग्रज चरित्रकार दिवंगत जॉन कुट्सी यांच्यावरच्या एका पुस्तकासाठी संशोधन करत असतो. विशेषतः कुट्सी अमेरिकेहून दक्षिण आफ्रिकेत परतले तेव्हाचा कालावधी मध्यवर्ती ठेवून त्याचं संशोधन सुरू असतं. त्याला मुलाखत देणाऱ्या व्यक्तींच्या बोलण्यातून समोर येणारा जॉन कुट्सी एक अवघडलेला इसम आहे, तो तिशीच्या उंबरठ्यावर असतानाही वडिलांसोबत राहत असतो, रटाळ शारीरिक श्रम करण्यावर भर देत असतो. त्याचे कुटुंबीय त्याच्याकडे शंकेने पाहतात आणि त्याच्याभोवती अनेक अफवा निर्माण होतात: त्याने अमेरिकेतल्या प्रशासनाशी वाद घातला होता, तो कविता लिहितो, अशा अफवा.

663 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गावातली जीवनदृश्यं”

Your email address will not be published.