111210cookie-checkप्रवास वर्णन संच

प्रवास वर्णन संच

वाचकांना प्रवास करण्यासाठी आणि मनमोकळे आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देणारी पुस्तके.
बेस कॅम्पवरून : महाराष्ट्रीयन गिर्यारोहकांचे अनुभव कथन.
संपादक – जयंत तुळपुळे, उष:प्रभा पागे, आनंद पाळंदे , दिलीप निंबाळकर
या पुस्तकामध्ये, महाराष्ट्रातील, नावाजलेल्या गिर्यारोहकांनी लिहिलेले, त्यांचे गिर्यारोहणाचे, थरारक अनुभव शब्दांकित केले आहेत.
किंमत – ३८०/-
सफर लेह लडाखची:
जम्मू काश्मीर, लेह लडाख परिसरातील बिनदिक्कत भटकायला जायचं असेल आणि तुमचे पर्यटन आनंददायी आणि सुखद घडावे असे वाटत असेल तर सोबतीला नियोजनाला एक उपुयुक्त पुस्तक. वि. ग. घाटे यांची लेह लडाखची ही सफर साधी-सोपी नाही. दुचाकीवरून केलेली ही साहसी सफर आहे. जम्मू, श्रीनगर, द्रास, कारगील, खारर्दुंगला, नुब्रा, व्हॅली, लेह आणि मनाली असा स्कुटरवरून केलेला हा आगळा वेगळा प्रवास आहे. तोही ६५ व्या वर्षी.
किंमत – १३०/-
सफर पूर्वांचलची: लेखक वि ग घाटे, स्वयंचलित दुचाकीने, अजून एक सफर, पूर्वांचलची, घडवून आणतात. या लेखकाचे अजून एक वाचनीय आणि प्रेरणादायी प्रवासवर्णन
किंमत – १२०/-
दोन चाके आणि मी:
हृषिकेश पाळंदे यांनी अहमदाबाद ते जम्मूपर्यंत सायकलवरून प्रवास केला, फक्त ५००० रु मध्ये. 1900 किलोमीटर प्रवास केलेल्या पाळंदे यांना या प्रवासात विविध अनुभव आले. मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने बघायला मिळाले. या प्रवासात केवळ काय खाल्लं? काय पाहिलं? याची जंत्री देण्याचा लेखकांचा हेतू नाही. तर या प्रवासात भेटलेली माणसे आणि अनुभवलेले प्रसंग यामुळे लेखकाच्या विचारसरणीत काय बदल होतात तेदेखील लेखक येथे सांगतो. https://www.youtube.com/watch?v=ZINgz_1bAPc – या लिंक वर तुम्ही या पुस्तकाचा review पाहू शकता.
किंमत – १६०/-

सर्व संचाची एकुण किंमत : ७९०/-
२५% सवलत आणि पोस्टज सह रु ६५०/- घरपोहोच

650 Rs

अधिक माहिती

Additional information

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रवास वर्णन संच”

Your email address will not be published.