85630cookie-checkसफर लेह लडाखची

सफर लेह लडाखची

जम्मू काश्मीर, लेह लडाख परिसरातील बिनदिक्कत भटकायला जायचं असेल आणि तुमचे पर्यटन आनंददायी आणि सुखद घडावे असे वाटत असेल तर सोबतीला नियोजनाला एक उपुयुक्त पुस्तक. वि. ग. घाटे यांची लेह लडाखची ही सफर साधी-सोपी नाही. दुचाकीवरून केलेली ही साहसी सफर आहे. जम्मू, श्रीनगर, द्रास, कारगील, खारर्दुंगला, नुब्रा, व्हॅली, लेह आणि मनाली असा स्कुटरवरून केलेला हा आगळा वेगळा प्रवास आहे. तोही ६५ व्या वर्षी.

हा प्रवास कसा करायचा त्याचा नकाशाही त्यांनी स्वतः तयार केला होता. कोणती अंतरे किती दिवसांत कापता येतील, समान, खाणे-पिणे, पाऊस, स्कुटर बिघडली तर काय करायचे, कारगीलमध्ये सीमेवर काय परिस्थिती असेल, अतिउंच खिंडीमधून निर्जन प्रदेशातून प्रवास आदींविषयी त्यांनी प्रस्थानापुर्वीविस्तृत विचार केला होता. ही सफर त्यांनी दैनंदिनीच्या शब्दबद्ध केली आहे. प्रवासात लागलेली महत्वाची गावे आणि त्यांची अंतरे यांचा तक्ता हौशिंसाठी उपयुक्त.

सफर लेह- लडाखची या पुस्तकातील तपशीलवार माहितीच्या आधारे तुम्ही जम्मू-काश्मीर,लेह-लडाख परिसरातील बिनदिक्कतपणे भटकायला जाऊ शकतात.
स्वयंचलित दुचाकी वा चार चाकी घेऊन उत्तुंग हिमालयाची आनंददायी दर्शन, जम्मू-काश्मीरचे सौंदर्य आणि लेह-लडाखचे रौद्र रूप अनुभवण्यासाठी वि. ग घाटेचें हे पुस्तक तुमचं जिवंत वाटाड्या ठराव.

प्रेक्षणीय स्थळ, रस्ते, अंतरे, मुक्कामाच्या जागा, प्रवासातील संभाव्य अडचणी किंवा अडथळे तसेच घ्यावयाची सावधगिरी आणि तेथे असलेली मदत केंद्रे इ. सखोल माहितीचे तुमचं पर्यटन अत्यंत सुखखरूप व सुखद बनेल. विशेषत बाईकस्वारांनी तर हे पुस्तक अभ्यासल्याशिवाय आपल्या सहलीची आखणीची करू नये.

97 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सफर लेह लडाखची”

Your email address will not be published.