108601cookie-checkसगळं उलथवून टाकलं पाहिजे

सगळं उलथवून टाकलं पाहिजे

◆ एका लढवय्या संघर्षयात्रीच्या जीवन संघर्षातून निर्माण झालेला व वास्तवाचं बोट न सोडता व्यवस्थेला धारेवर धरणाऱ्या कविता म्हणजेच देवा झिंजाड ह्यांचा….●
● सगळं उलथवून टाकलं पाहिजे ●हा कवितासंग्रह होय….
~~~~~~~~~
आजकाल सगळंच कसं ऑनलाईन झालय.
अगदी त्याच ऑनलाइन दुनियेमध्ये गेल्या आठ वर्षापासून देवांशी कनेक्टेड झालेला, त्यांच्याशी सतत वैचारिक भांडण करणारा तरीही त्यांच्या काळजातला मी एक वाचक.
दादांच्या काव्य लेखनाचा परामर्श घेताना एक आवर्जून नमूद करेन की,
सगळं उलथवून टाकलं पाहिजे म्हणजे समाजाला वास्तवाची करून देत व्यवस्थेला सूचक वाट निर्माण करून देणार्‍या कवीचा हुंदका आहे, बंड आहे, त्याचा विद्रोह आहे. कवीचे शब्द सामर्थ्य व्यवस्थेला सुरुंग लावणारं मातीशी नाळ जोडणारं आणि नैराशेच्या गर्तेत असणाऱ्या माणसाला बळ देणारं आहे.
आपल्या पहिल्याच टायघाल्या रचनेमध्ये कवीने,
अगतिक बळीराजाची तडफड कधीच कळत नाही टायघाल्या लोकांना एसीतं बसल्यावर.
*
गाडग्या मडक्यात गोमतार साठवणाऱ्याअन रक्त आटवूण बाटूक जगवणाऱ्या,
डोळ्यातलं पाणी दिसण्यासाठी गावठी गाईच काळीज लागतं.
एकता कपूरच्या मालिका पाहताना ओघळणारं पाणी काय कामाचं??
*
असा संवेदनशील प्रश्न व्यवस्थेपुढे, उभा केलाय.
त्याचबरोबर तथाकथित समाज सुधारक आणि राजकीय नेतृत्वाला चिमटा काढताना
कमोड धारी माणसांना शेना मातीचा वास नाकात खूपतो,
अन यांना हल्ली गाडगेबाबा व्हायला सुद्धा कॅमेरामॅन लागतो.!
अशी चपराक कवी देतो.
त्याचबरोबर हे सांगत असताना दुसरीकडे
क्रांती झाली पाहिजे,
क्रांती झाली पाहिजे,
*स्वतःपासून आधी
*क्रांती झाली पाहिजे,
सगळं उलथवून टाकलं पाहिजे !
असा नारा देत कवी क्रांतीचे स्फुलिंग समाजमनात पेरत जातो .
वेशीबाहेर येऊन
*राजवाड्यात राज़े राहतात
की आणखी कोण?
*ह्या प्रश्नाचं उत्तर
*ज्यांना अजून देता नाही आलं,
*त्यांच्या वेशी
उडवून द्यायला पाहिजेत बॉम्बने.
असा गर्भित इशारा द्यायलाही कवी मागेपुढे पाहत नाही.
निर्भयाच्या यादीत मधून
*बलात्कार झाला म्हणून
चित्कार करायचे काय काम?
येथे उपचार मोफत केले जातात.
अशी आरोळी देत कवी दांभिक तथाकथित चेहऱ्यांना डायरेक्ट जाब विचारतात .
जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी दुःख कष्ट परिश्रम ज्ञान याशिवाय पर्याय नाही याची जाणीव करून देताना कवी, जीवन ही अडथळ्यांची शर्यत आहे गरिबांची शेतकऱ्यांची शोषितांची आणि स्त्रियांची दुःख कमी होणारी नाहीत याची जाणीव करून देतात.
घरात वीस पोताडी ज्वारी पडलेली असते,
*तरी शेजारची बाई उपाशी पोटी
पुरवून घेते स्वतःचे डोहाळे.
ही आगतिकता मांडताना जीवनातला संघर्ष सोपा नाही. हे सांगायला कवी विसरत नाही.
हीअडथळ्यांची शर्यत पार करण्यासाठी सगळं उलथवून टाकलं पाहिजे यासाठी दादांचा अट्टाहास आहे.
भुकेची आग शमवणारा माणूस जेव्हा आपल्याच माणसांची भूक हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो अशा वृत्ती पासून सावध राहण्याचा इशारा देत अशा वृत्तींना मातीमोल करण्यासाठी सल्ला कवी पानांपानांत देतात.
समाजातील दांभिकतेवर कडवा प्रहार करत
बेसन भाकर मध्ये,
*उपाशी मेले पोटातले कावळे
* पण कोणीच नाही दिला
* चतकोर भाकरीचाही आधार,
* जेव्हा बाप जिवंत होता,*
मात्र
*दहा दिवस
*बेसन भाकरी देऊन देऊन
* नकोसं केलं होतं लोकांनी
* बाप गेल्यावर.*
असा काळजातला डोंब कवी जना समोर मांडतो.
जीवन चक्रातील भाकरायण म्हणजे कविने केलेले बंड, अत्याचाराविरोधात जनमानसात बंड करून उठायची ताकद ,शब्दांच्या सोबतच मेंदूतील धग, प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेला आटोकाट प्रयत्न कवीने पोटतिडकीने मांडला आहे.
शोषक उजळ माथ्याने समाजात फिरतोय आणि पीडित भीतीपोटी घरात लपून भूमिगत होतोय हे बदलण्यासाठी सगळं उलथवून टाकायला हवं असा आशावादी विचार कवीच्या प्रत्येक रचनेतून व्यक्त होताना दिसतो.
आई म्हणते मध्ये,,, आईबद्दलच्या हृदयबंद भावना आईची कमतरता आणि आईच्या कष्टमय आयुष्याच्या आठवणी
*कसं सांगू माऊली
अगं तुझं जिणं मी रेखाटत असतो,
*उतारवयातला तुझा त्रास
माझ्या आसवांत गोठवत असतो.
अशा काळजाचा ठाव घेणाऱ्या शब्दात मांडल्या आहेत.
स्वतःला कवीचे लेबल लावून फिरणाऱ्या सो कॉल्ड कवींना,
त्याच त्याच कविता ऐकून
जीव आलाय कानात
अन एखादी नवीन कविता ऐकायला
कवींना नेऊन हाणावे लागेल रानात.
असे धारेवर धरले आहे.
कविता संग्रहात जवळपास पाऊणशे
कविता असून सर्वच कविता वाचकांच्या, मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. हर्मिससारख्या दर्जेदार प्रकाशनाकडून उजेडात आलेला उत्तम संग्रह.
प्रदीप खेतमर यांनी तयार केलेले मुखपृष्ठ व्यवस्थेचा डोंगर फोडणाऱ्या,आणि अडचणींच्या पहाडावर एकाकी पहार घाव घालून व्यवस्था बदलणाऱ्या *दशरथ मांझीची आठवण करून देते.
काव्यसंग्रह वाचल्यानंतर लक्षात येईल की संघर्ष म्हणजे नेमकं काय? संघर्षातून ऊर्जा निर्माण होते आणि प्रबोधनाची ठिणगीही त्यातूनच जन्म घेते.सामाजिक समतेचा एल्गार उभा राहतो. *एकंदरीत मनुष्य जीवनाचा सार हा त्यांनी स्वतः अनुभवलेल्या घटनावरून देवा झिंजाड यांनी समर्पक पणे मांडला आहे.
गांडुरोग, बोरी, तरण्याबांड देवा, हरवलेल्या हिरव्या बांगड्या, पांढरी कबूतरं, तुकाराम शेठ,, अश्व लावूया लोकहो, यासह देवाच्या लेखणीतून साकार झालेली प्रत्येक कविता ही त्यांच्या संघर्षाची पोहचपावती आहे. संघर्षातून माणूस घडतो. आजचा संघर्ष हे उद्याचे सामर्थ्य आहे. म्हणून हा कविता संग्रह आजच्या समाजव्यवस्थेसाठी प्रेरणादायी असा आहे. ज्या वेदना जगण्याचा संघर्ष करतांना अनुभवायला मिळतात, त्यातून निर्माण होणारी कविता ही आपल्या मनगटाच्या जोरावर अस्तिव निर्माण करणारी असते याची क्षणाक्षणाला जाणीव करून देणारा हा काव्यसंग्रह.
संघर्षाची जाणीव निर्माण करून देणारी, श्रमाची, शेतीची, मातीची, शेतमजुराची, स्रियांची आणि त्यांच्या व्यथा मांडणारी कष्टाची, वास्तव परिस्थिती कथन करणारी, प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत जगणारी माणसं, त्यांच्या जीवन मरणाशी निगडित असणाऱ्या गोष्टी, परिस्थितीला सामोरे जाणारा सामान्य माणूस आणि परिस्थिती उलथून टाकण्यासाठी होणारी त्याची तगमग ,ही देवादादाच्या लेखणीची बलस्थाने.
अन सर्वात महत्वाचे म्हणजे सगळ्यांची एक ओरड असते की कवितासंग्रह विकले जातात नाहीत किंवा पहिलीच आवृत्ती आयुष्यभर पुरते
पण ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ हा कवितासंग्रह मराठी वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आहे अन केवळ एका महिन्याच्या आतच ८०० हुन अधिक प्रती विकल्या गेल्या. ह्याच महिन्यात दुसरी आवृत्ती येईल ह्याची खात्री त्यांना आहे.
अशा ह्या वादळ उभं करणाऱ्या कवितेच्या मशालीला मनःपूर्वक शुभेच्छा…!
तसेच प्रस्तावित आगामी कादंबरीसाठीसुद्धा खूप खूप शुभेच्छा !
✒…. राहुलकुमार महानंदा सुरेश.

200 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सगळं उलथवून टाकलं पाहिजे”

Your email address will not be published.