37810cookie-checkसंताजी

संताजी

(1 customer review)

संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर अवघ्या सहा महिन्यात मराठ्यांचे राज्य मोडले. औरंगजेबाला वाटले, मराठे आता संपले ! आणि..
अचानक एक भयंकर वादळ घोंघावू लागले. या वादळाने सत्तेच्या सागरावर तोऱ्यात तरंगणाऱ्या मोगल साम्राज्याच्या अवाढव्य जहाजाची शिडे फाडली, डोलकाठ्या मोडल्या. त्याच्या पताका नि छत्रचामरे चिरफाळून पराजयाच्या पर्वतप्राय लाटांवर नाचवत पुन्हा त्याने त्याला सागराच्या मध्यभागी नेऊन सोडले. त्यानंतर पुन्हा कधीही या जहाजाला यशाचा किनारा दिसलाच नाही. अखेर ते बुडाले.
दख्खनच्या धरतीवर उसळलेल्या त्या वादळाचे नाव होते संताजी घोरपडे !
राष्ट्राच्या आपत्काली उभ्या देहाची तलवार करून मराठ्यांचा हा महान सेनापती शत्रूवर कडोविकडीने कोसळला. ही कहाणी त्या रणमर्दाच्या बेजरब झुंजीची, त्याच्या पराक्रमाची आणि अप्रतिम रणकौशल्याची आहे ! पाशवी परचक्राच्या कठीण कालखंडात तमाम महाराष्ट्र एका बलाढ्य साम्राज्याशी कसा लढला, कसा जिंकला नि कसा जगला याचा ज्वलंत इतिहास सांगणारा ऐतिहासिक दस्तऐवज आहे हा.
संताजींची युद्धनीती हे प्रकरण इतिहास प्रेमींसाठी जोडत आहे. जरूर वाचा.

525 Rs

अधिक माहिती

Additional information

Weight 0.792 kg
Author

Kaka Visdhate

Binding

Handcover

ISBN

8187549432

Language

मराठी

Pages

904

Publications

Weight (in Kg)

1 review for संताजी

  1. mahaveer8935

    Good

Add a review

Your email address will not be published.