112230cookie-checkशामनिक पॉवर अ‍ॅनिमल्स

शामनिक पॉवर अ‍ॅनिमल्स

या सुंदर पृथ्वीतलावर आपल्या सोबत जे इतर प्राणीमात्र वास्तव्यास आहेत त्यांच्याविषयी आदरभाव राखण्याची शिकवण टॉलटेक परंपरेत सांगण्यात आली आहे. त्या प्राणीमात्रांच्या ठायी असलेल्या सामर्थ्यातून आलेल्या गुणधर्मातून आणि त्यांच्या वर्तणुकीतून आपण शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत हे आपण मान्य करतो.
प्रस्तुत पुस्तकामधे, माझा मुलगा डॉन जोज रुईज याने अत्यंत मनापासून, मनुष्येतर प्राण्यांचे शहाणपण आपल्यापुढे मांडले आहे. आपली मने मुक्त करून “आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण स्वतःच कसे व्हायचे” हे सांगण्यासाठी प्राणीजगतातील अनेक उदाहरणे व उपमा त्याने आपल्याला सांगितल्या आहेत. प्राणीजगताकडून मनुष्यप्राण्यास काय शिकता येईल हे या पुस्तकाच्या उलगडणार्‍या पानांमधून तो आपणास सांगत जातो. त्याचबरोबर जसे आपण आपले ज्ञान, आपल्या भावना व आपले अनुभव आजूबाजूच्या जगात प्रदर्शित करतो तसेच प्राणीमात्रांशी आपली वागणूक हीसुद्धा आपल्यात दडलेल्या अनेक रहस्यांवर प्रकाश टाकते.
उदाहरणच द्यायचे झाले तर, जसजसे आपण या प्राणीमात्रांच्या वागणुकीचे निरीक्षण करू लागतो तसे आपला कल आपण आपली तुलना त्यांच्याशी करण्याकडे वाढू लागतो. आपल्याला काही प्राण्यांसारखे बनावेसे वाटू लागते, जेणेकरून त्यांचा डौलदारपणा, त्यांची बुद्धिमता व त्यांची शक्ती ही आपल्यातून प्रदर्शित होईल. या उलट, काही प्राण्यांबद्दल आपल्याला भीती वाटते व त्यांची वागणूक आपण तिरस्करणीय समजतो. यातूनच आपण स्वतःचे स्वतः समजून घेऊ शकतो की आपल्या जीवनात काय बदल घडवणे जरूरीचे आहे.
या पुस्तकात दिलेले प्राणीमात्रांविषयीचे ज्ञान हे अंतिम सत्य किंवा ‘ब्रम्ह वाक्य’ आहे असा जराही दावा नाही. शतकानुशतके आपण आपल्या व मानवेतर इतर प्राण्यांशी असलेल्या संबंधांविषयीच्या कथा पुनःपुन्हा सांगत आलो आहोत. त्या नक्कीच आपल्याला मदत करू शकतील पण जर का आपण काळजी घेतली नाही तर त्या कथा म्हणजे ‘ब्रम्ह वाक्य’ आहे असा आपला समज होण्याची शक्यता आहे. अशामुळेच आपले मन या उपयुक्त कथांचे अंधश्रद्धेमधे रूपांतर करते व त्यामुळेच स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला वापरणार्‍या माणसांना आपण बळी पडतो.
सर्व अंधश्रद्धांपासून, अगदी त्या प्राणी जीवनाविषयातून आलेल्या का असेनात, स्वतःला मुक्त करावे व आपल्या अंतःप्रेरणेवरच विश्वास ठेवावा हीच शिकवण टॉलटेक परंपरेमधून देण्यात आली आहे व ही शिकवण मानवेतर प्राणी कधीच विसरलेले नाहीत.
या पुस्तकामुळे आपल्या जीवनात प्रेम व आनंद यांची भर पडेल व त्याच बरोबर पुढे येणारी कित्येक वर्षे तुम्ही आपल्या संग्रहात विशेष स्थान मिळवलेल्या या पुस्तकाचा, अंतरंगांचे यथार्थ ज्ञान देणारा स्रोत म्हणून वरचेवर संदर्भ घ्याल अशी मला आशा वाटते.
प्रेमपूर्वक आपला,
डॉन म्यूग्युएल रुईज
(4 अ‍ॅग्रिमेंटस् या जागतिक बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक.)
या पुस्तकात,
* मनुष्येतर प्राणीबांधवांकडून मिळणारी अद्वितीय ‘प्राणी उपचारपद्धती’
* प्राण्यांकडून शिकवण विचारात घेताना ध्यानात ठेवायच्या गोष्टी
* आपले शक्तिस्थान आणि दोषही दाखवणारे प्राणी
* शामन सामर्थ्याचे प्राणीमात्र
* टॉलटेक शामनिक विचारधारा
* 64 प्राण्यांकडून 64 कौशल्ये, धडे
* प्राण्यांच्या चैतन्यास आव्हान करण्याची पद्धत
* प्राण्यांच्या ऊर्जेप्रीत्यर्थ केलेली प्रार्थना
* आत्मशक्तीचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक
* आत्मक्लेशांच्या व्यनाधीनतेतून मुक्ततेचा मार्ग
शामनिक पॉवर अ‍ॅनिमल्स.

210 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शामनिक पॉवर अ‍ॅनिमल्स”

Your email address will not be published.