99780cookie-checkस्लमडॉग CA

स्लमडॉग CA

‘स्लमडॉग सीए’ एका जिद्दी तरुणाचा जीवन-प्रवास. शून्यापासून नाही तर उणेपासून सुरू झालेला जिद्दीचा प्रवास.
प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता त्याला सामोरे कसे जावे व आपले ध्येय साध्य कसे करावे हा विचार या संपूर्ण कादंबरीत जाणवतो.
सभोवतालची परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती आपण बदलू शकतो असा ज्वलंत सकारात्मक विचार तरुण पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. तुमच्यातील सुप्त गुण ओळखून तुम्हाला मदतीचा हात देणारे समाजात अनेक जण असतात हे पदोपदी जाणवले.
कथानक मनाची पकड घेते.
आईवरील निस्सीम प्रेम, जिवलग मित्रांचे अनमोल सहकार्य व लक्ष्य गाठण्यासाठी धडपड या तरुणात जाणवते. मोठं होण्यासाठी असंख्य अडचणीतून जावे लागते. निरनिराळे छोटे छोटे उद्योग करून अर्थप्राप्ती करण्याचे प्रसंग छान रेखाटले आहेत.
लेखकाची ओघवती भाषा व कथानकाचे मुद्देसूद वर्णन करायची शैली पदोपदी जाणवते.
एक सुरेख व मार्गदर्शनपर कादंबरी वाचल्याचे समाधान ही कादंबरी देऊन जाते.

146 Rs

अधिक माहिती

Additional information

Weight 0.190 kg
Author

Manoj Ambike

Binding

Paperback

ISBN No

9.79E+12

Language

Marathi

Pages

184

Publications

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्लमडॉग CA”

Your email address will not be published.