102220cookie-checkस्टार्टअप करणारच मी उद्योजक होणारच

स्टार्टअप करणारच मी उद्योजक होणारच

हल्ली ‘स्टार्टअप’ हा जणू परवलीचा शब्द बनला आहे. पण स्टार्टअप म्हणजे नेमके काय, कोण व कशा प्रकारे स्टार्टअप सुरु करू शकतो ,हे डॉ. विठ्ठल इंदिरा व्यकंटेश कामत यांनी ‘स्टार्टअप करणारच मी, उद्योजक होणारच मी’ मधून सर्वसामन्यांसमोर सोप्या भाषेत मांडले आहे . १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते ८२ वर्षाच्या ज्येष्ठ विद्यार्थी वाचक गटासाठी हे पुस्तक असल्याने लेखकाने यात नमूद केले आहे . त्यानुसार लेखनाची भाषाशैलीही दिलखुलास आहे . विठ्ठल कामत स्वतः उद्योजक कसे झाले , हे उलगडतानाच स्टार्टअप करताना स्वतःचे मूल्यमापन , आत्मपरीक्षण कसे करायचे याचे मार्गदर्शन केले आहेत. संतुलित विचारशक्ती , प्रबळ मनःशक्ती आणि दूरदृष्टी हा पाया धरून त्याला व्यवहारीकतेची जोड दिल्यास आपण आयुष्यात यशस्वी उद्योजक होणारच , हा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. स्टार्टअप करताना बदलाचा स्वेच्छेने स्वीकार करणे , स्टार्टअपपूर्वीची तयारी , स्टार्टअप आणि उद्योगातील फरक , श्रद्धा , आत्मविश्वास बाळगणे , स्टार्टअप सुरु झाल्यावर त्याचे उद्योगात रुपांतर करण्यासाठी तयारी व त्यानंतर यशस्वी उद्योजकासाठीचे तंत्र यातून समजावून सांगितले आहे.

187 Rs

अधिक माहिती

Additional information

Weight 0.311 kg
Author

Vitthal Kamat

Binding

Paperback

ISBN No

9789385223945

Language

Marathi

Pages

272

Publications

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्टार्टअप करणारच मी उद्योजक होणारच”

Your email address will not be published.