85730cookie-checkताणाबाणा

ताणाबाणा

वस्त्र विणताना उभा धागा म्हणजे ताणा आणि आडवा धागा म्हणजे बाणा. ताणबाणा एकत्र गुंफले की वस्त्र निर्माण होतं. माणसाच्या आयुष्यातही ताणाबाणा असतो. त्यामुळे आयुष्यचं विणकाम सुबक आणि रेखीव होतं. राजवंशांना वस्त्रं पुरवणारा उच्च प्रतीची वस्त्रं विणणारा, दोन पुराणं असणारा स्वकुळ साळी समाज उच्च दर्जाचा कलाकार आहे. त्याला रेशीम, सुती धागा, रंग ह्यांचं पूर्ण ज्ञान असतं.

हातमागाच्या सर्व आयुधांची जुळवाजुळव करताना तो मेकॅनिक इंजिनियरच्या तोडीची कारागिरी दाखवतो. असा हा साळी समाज यंत्रमागाच्या आगमानानंतर देशोधडीला लागला. तो समाज त्या दयनीय अवस्थेतून शिक्षणाच्या माध्यमातून तरला. लेखकाने ही सर्व कहाणी प्रभावी आणि समर्थपणे एका कुटुंबाच्या कथेतून सादर केली आहे. ही कथा पुढे नेताना लेखकाने इतरांवर दोषारोप न करता साळी समाजातील त्रुटींवर नेमकं बोट ठेवलं आहे.

180 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ताणाबाणा”

Your email address will not be published.