181840cookie-checkवलयांकित क्रिकेटपटू

वलयांकित क्रिकेटपटू

सचिन तेंडुलकर शारदाश्रमचा शाळकरी मुलगा. त्रिशतकांची माळ लावून क्रिकेट क्षितीजावर अवतरला. १९८६ मध्ये त्याने विनोद कांबळीसह ६६४ धावांची नाबाद भागीदारी करून विश्वविक्रम रचला. शाळकरी सचिनची विश्वविक्रमाची हाव निवृत्त होईपर्यंत कायम राहिली. वेस्ट इंडिजच्या तोफखान्याचा सलामीच्या मालिकेत सुनील गावसकरने निधड्या छातीने सामना केला. ब्रॅडमॅनचा २९ शतकांचा विक्रम आणि १०,००० धावांची वेस प्रथम ओलांडण्याचा मान गावसकरनेच पटकावला. कणखर शरीरयष्टीचा वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज कपिल देव. भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार. त्याला आदर्श मानून भारतात वेगवान गोलंदाजांचं अमाप पिक आलं. त्याची चवदार फळं अलिकडे मिळत आहेत.

सुभाष गुप्ते, विनू मंकड आणि विख्यात फिरकी चौकडी ( बेदी, चंद्रशेखर, प्रसन्ना आणि वेंकटराघवन) ह्यांची रोमहर्षक कामगिरी आठवताना अभिमानाने ऊर भरून येतो.

गुंडाप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, विराट कोहली ह्या फलंदाजांनी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

भारतीय क्रिकेटपटूंशिवाय गारफिल्ड सोबर्स, वेस्ली हॉल, मुथय्या मुरलीधरन, कर्टनी वॉल्श, स्टीव्ह वॉ, ग्लेन मॅकग्रा इत्यादी परदेशी क्रिकेटपटूंनी क्रिकेटविश्वात ठसा उमटवला.

अशा अनेक क्रिकेटपटूंच्या रोचक आणि चित्त गुंगवून टाकणाऱ्या कथा वाचताना क्रिकेट रसिक दंग होईल. ह्या पुस्तकाला संग्राह्य मूल्य आहे. भाषाशैली वाचकांची उत्कंठा वाढवणारी आहे.

-आदिनाथ हरवंदे

270 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वलयांकित क्रिकेटपटू”

Your email address will not be published.