85950cookie-checkवेदना आणि प्रेरणा

वेदना आणि प्रेरणा

‘अलगताविलगता’ समजण्यासाठी हवी मार्गदर्शक दृष्टी. ऐहिक पातळीवर त्याचा शोध घेता येत नाही. ‘ओठांवर दात आवळून घेतल्यानंतर झालुच जखम, तर त्यातील आनंदपाणी प्यायचं असतं’ लेखकाचे हे एक वाक्य ‘रंगी सुरंगतेची आगळीक’ उधळीत रसिकांच्या भेदबुद्धीचा लय करीत हृदयाला स्पर्श करणारे अभेदाच्या ‘आत्मनिष्ठ’ तत्त्वज्ञान गळी उतरविते. ‘बीज नाही ठाव’ मधील ‘फांदीवर पाखरांचा उज्जहोम रानफुला संगतीतच होतो’ ओळीनंतर ‘पाकळीचे पदर ओले झाले की कुपोषण होते’ ही ओळ वाचत असता रसिक मनाला आठवण होते आशयाची आणि आवश्यक शब्दपात्रांची. त्याचा मेळ या ललीतलेखनात दिसतो.

पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा – ९६२३२१८६२५ / ९४२२५ ०४०३०
मराठी साहित्य डॉ एक ऐन पठाण (शाबा) त्यांनी एक नवीन जीवन शैली दाखवली आहे. मराठी मुस्लिम, मातीशी किती एकरूप असतो हे त्यांच्या ‘वेदना आणि प्रेरणा’ आत्मकथात्मक मर्मस्पर्शी, सत्यदर्शी विनयशील धारणा ठेवून आवश्यक त्या सुधारणा करण्यास त्यांनी मनोभूमी सदैव तयार असते.
सध्या जीवनात यशस्वि कसे व्हावे म्हणून डेली कार्नेजी पासून तर शिवखेरा पर्यंत पुस्तके आहेत! पण ‘वेदना आणि प्रेरणा’ वाचल्यावर वाचकांना यशस्वी जीवन जगण्याची खरी ऊर्जा, उत्साह आणि उमेद मिळेल.
‘आपत्तीच्या धुळीतून ध्येयसक्तीच्या ध्रुवताऱ्याकडे’ वाटचाल करणारा त्यांचा जीवनप्रवास वाचकांना दिलासा देणारा सहहृदय सहवास वाटतो. आपल्या हितशत्रूंना देखील हळुवारपणे समजून घेणारी त्यांची संवेदना अतिशय दुर्मिळ आहे. त्यांच्या वाट्याला साहित्यात सदैव उपेक्षा, उपहास आला त्या गरीब कष्टकरी समाजाचे ‘कुलगुरू व्हावे’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ‘सर्वधर्म समभाव’ सर्वत्र प्रस्थापित व्हावा म्हणून अविरत प्रयत्न करणारे एस. ऐन. पठाण मराठी साहित्याचा ‘जीवन गौरव’ मानकरी आहेत.

170 Rs

Out of stock

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वेदना आणि प्रेरणा”

Your email address will not be published.