148220cookie-checkवॉल्डनकाठी विचारविहार

वॉल्डनकाठी विचारविहार

वॉल्डनकाठी विचार-विहार
हेन्री डेव्हिड थोरो यांच्या ‘वॉल्डन’
ग्रंथाचा अनुवाद
अनुवादक : दुर्गा भागवत
हेन्री डेव्हिड थोरो हा एकोणिसाव्या
शतकातला अमेरिकन लेखक.
तो हयात असताना त्याच्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेले
नव्हते. उलट एक विक्षिप्त आणि अव्यवहारी माणूस अशा शब्दांनीच त्याची अवहेलना झाली. पण त्याच्या मृत्यूनंतर मात्र त्याचे महत्त्व लोकांना कळले आणि थोरो थोड्या लवकर जन्माला आला, असे टीकाकार म्हणू लागले.
कॉन्कॉर्ड (मॅसाच्युसेट्स) येथे १८१७ मध्ये त्याचा जन्म झाला आणि तेथेच तो १८६२ मध्ये मरण पावला. लोक सर्वसामान्यपणे ज्या पद्धतीने जीवन व्यतीत करतात त्या पद्धतीचा थोरोला प्रथमपासून तिटकारा होता. त्यामुळे
त्याने जगावेगळा मार्ग पत्करला आणि म्हणून तो आपल्या हयातीत विक्षिप्त बनला. कॉन्कॉर्ड खेड्यातील शेतातून आणि झाडाझुडपांतून तो मोकाटपणे भटकायचा. गावच्या नदीवर नावेतून तो नित्यनेमाने फेरफटका मारायचा.
निसर्गाची बारकाईने पाहणी करायचा. अशाच अनुभवावर त्याने आपल्या जर्नल मध्ये टिपणे लिहिली. तीसुद्धा मूलतः स्वतःच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी. त्याच्या लेखनाला तत्त्वज्ञानाची, सौंदर्याची आणि शास्त्रीय
दृष्टिकोनाची अशी तिहेरी बैठक आहे.
हे करीत असताना स्वतःच्या उपजीविकेसाठी त्याने मोलमजुरी केली . वडिलांच्या शिसपेन्सिलीच्या कारखान्यात शिसपेन्सिली केल्या. काही ठिकाणी बागवानाचे काम केले. तथापि उपजीविकेसाठी हे सारे करीत असताना भ्रमंती, नौकाविहार, चिंतन, निसर्गप्रेम, काव्यलेखन यात त्याने खंड पडू दिला नाही. आपल्या उपजीविकेच्या धडपडीत आपण आपले हे छंद बंद
केले नाहीत, याचा त्याला अभिमान वाटायचा.
वॉल्डन सरोवराशेजारी राहत असताना तो पूर्णपणे निसर्गाशी समरस झाला होता. प्राणी, पक्षी, झाडे यांचे आवाज ऐकण्यात त्याला धन्यता वाटत असे.
१८५४ मध्ये त्याचे वॉल्डन हे सर्वश्रेष्ठ पुस्तक प्रसिद्ध झाले. निसर्गाच्या सान्निध्यात त्याने जो अनुभव लुटला त्यातूनच हे पुस्तक जन्माला आले.
वॉल्डनकाठी विचार-विहार
हेन्री डेव्हिड थोरो यांच्या ‘वॉल्डन’
ग्रंथाचा अनुवाद
अनुवादक : दुर्गा भागवत

400 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वॉल्डनकाठी विचारविहार”

Your email address will not be published.