Description
भारताचा प्रदीप्त इतिहास वीरांप्रमाणे इथल्या वीरनारींच्याही पराक्रमाचा साक्षीदार आहे. परकीय आक्रमकांशी लढत या वीरांगनांनी स्वातंत्र्य अबाधित ठेवलं तसंच अंतर्गत बंडखोरांचं दमन करून सुराज्य प्रस्थापित केलं. लोकप्रशासन, रणकौशल्य, मुत्सद्देगिरी, अर्थकारण, न्यायव्यवस्था, परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा अनेक पैलूंनी त्यांचं कर्तृत्व समृद्ध होतं.
गत दोन सहस्रकांमधल्या या निवडक गाथांमध्ये भारताच्या वैविध्यपूर्ण आणि प्रवाही संस्कृतीचं एकात्म सूत्र आपल्याला जाणवतं. संकीर्ण धाग्यांनी विणलेल्या स्त्रीमनाचे विविध पदर उलगडत उपेक्षेच्या सावटाखाली असलेल्या त्यांच्या योगदानावर टाकलेला हा प्रकाशझोत आहे. भारतीय स्त्रीच्या सामर्थ्याचे, स्वाभिमानाचे आणि समर्पणाचे हे तेजस्वी अध्याय म्हणजे राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा आहे.
Additional Information
Publications : मिहाना पब्लिकेशन (Mihana Publication )
Author : मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी ( Mejar Mohini Garge Kulkarni )
Binding : Paperback
ISBN No : 9788197301131
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 705 gms
Width : 14
Height : 5
Length : 22
Edition : 6
Pages : 836