संताजी परिचय

santaji

वाचनाचे महत्त्व सागंणारा श्लोक. …

वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्यं शीलरक्षकम्।
वार्धक्ये दु:खहरणं हितं सद्ग्रन्थवाचनम्।।

बालपणी वाचन आनंद देणारे असते. तरुणपणी चारित्र्याचे रक्षण करणारे असते. वृद्धपणी दुःख दूर करणारे असते. चांगल्या ग्रंथांचे वाचन नेहमी हितकारक असते.

श्र्लोक … अगदी योग्य वेळी मिळाला…
ज्यावेळी काका विधातें सारख्या सिध्दहस्त, अभ्यासू, संशोधक वृत्तीने केलेलं लिखाण स्वहस्ते.. आपल्याला सप्रेम भेट स्वरुपात देतात…

‘संताजी’ ही काकांची जगभर गाजत असलेली कलाकृती… जी काकासाहेब विधातेंनी स्वहस्ते आम्हाला सप्रेम भेट दिली आणि हा आनंद नुसता द्विगुणीतच नाही तर शतगुणीत झाला …

खरं सांगायचं तर आजपर्यंत चार ते पाच वेळा ही कलाकृती मी खरेदी करून वाचायचा प्रयत्न पण केला, पण प्रत्येकवेळी हा संकल्प काही पुर्णत्वास गेला नाहीच… कारण .. हा ग्रंथच माझेकडे राहायचा नाही… कोणीतरी सन्माननीय… हा ग्रंथ माझ्या कडे मागणी करायचा आणि मी पण वाचून पण न झालेली कलाकृती त्या़च्याकडे सोपवून मोकळा होत होतो..
एकादोघांनी तर वाचून परत देतो म्हणूनही नेले…
पण…असो,…
तर आज असे हा संग्राह्य ग्रंथ पुनः एकदा माझ्या संग्रहात दाखल झालेला आहे आणि तो सुध्दा स्वत: काकांकडून…
शतशः धन्यवाद…सर्वांचेच…
ज्यांनी माझ्या कडून नेऊन परत नाही केला तयांचेही…!!!

कारण .. कदाचित त्यामुळेच काकांची स्वाक्षरी असलेली प्रत मला मिळाली…


संताजी
🌹🌹🌹🌹🌹
इतिहास…
खरं तर हा बहुतेकांच्या आवडीचा, बरेच जणांचा नावडता विषय… ती अगम्य भाषांमधील अगम्य कागदपत्रे,नव्याने उपलब्ध झालेली, उजेडात आलेली माहिती, या सगळ्यातून त्यांचे वास्तव अर्थ नेमकेपणाने हुडकून, त्यामध्ये सुसंगती लावून, सुसुत्रता आणून ऐतिहासिक वास्तवातील नाट्य,नाट्यमय रीतीने न मांडता, इतिहासातील नाट्य वास्तव रुपात मांडणे हे खरं तर शिवधनुष्य पेलण्या इतकंच अवघड…
पण मा.काका विधाते यांनी ‘संताजी’ आपल्या समोर चितारताना,उभा करत असताना हे शिवधनुष्य नुसते पेललेलंच नाही तर त्यावर आपल्या विशिष्ट शैलीची प्रत्यंचा चढवून रसिक वाचकांच्या ह्रदयावर आपल्या अथांग शब्दसामर्थ्याने अचूक शरसंधान पण केलेलं आहे.
वास्तव… किती अविश्वसनीय असू शकते, आणि किती भासमान असते याचा प्रत्यय संताजी वाचताना येतोच येतो.

कादंबरी… हा वाचकप्रिय लेखनप्रकार..
पण आजवरच्या कथाकार, कादंबरीकारांनी नायक उभे करताना घेतलेलं स्वातंत्र्य मा. काका विधाते नी घेतलं आहे असे वाटत नाही. कारभारी लोकांचे कट, छ.शिवशंभूंच्या मार्गदर्शक तत्वांवर चालणारा, त्यात स्वकल्पकतेची भर घालून, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, गनिमांच्या शक्तीचा सांगोपांग विचार करून, गनिमीकावा तंत्राची दाहकता , अचुकता, वाढविणारा … नकळतपणे रणनिती बदलून नवी युध्दनीती जवळ करणारा समस्त सेना धुरंधर, ममलकतमदार, संताजी च्या रुपातील रांगडा, स्वराज्यनिष्ठ योध्दा आपल्या समोर असा काही उभा केला आहे की आपणच तो काळ जगतोय असे वाटावे…!!!

मला वाटतंय कि प्रत्येक शिवप्रेमी माणसांनी ही कलाकृती अनुभवायला हवी आहे.
मा. काका विधाते यांच्या अथक परिश्रमातील सातत्य आणि वास्तव इतिहास मांडण्याची तळमळ, त्यांचे शब्दसंग्रह,शब्दसामर्थ्य.. अफलातून शब्दांकन, नेमकेपणा चा अट्टाहास… सर्वच गोष्टींना… एक सामान्य वाचक म्हणून ,
एक वंशज म्हणून सलाम, मानाचा मुजरा, अभिवादन आणि अभिनंदन…!!!!

काका विधाते यांचे शतशः धन्यवाद…!!!
🌹🙏🏻🌹

इंद्रजितसिंह वि घोरपडे हिंदुराव गजेंद्रगडकर

74800cookie-checkसंताजी परिचय
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.