‘द सायन्स ऑफ गेटिंग रिच..’

science

माझे आवडते पुस्तक…‘द सायन्स ऑफ गेटिंग रिच..’ पुस्तकाचे एक अनोखे विश्व असते..पुस्तके नेहमीच जगण्याला दिशा देत असतात..जगण्याला नवा आयाम देतात.. काही पुस्तके तर अक्षरशः वेड लावतात..आपल्याला दीपस्तंभ ठरलेले पुस्तक इतरांनीही वाचावे आणि त्यांच्या आयुष्यातही बदल व्हावा असे आपल्याला मनापासून वाटते..मग आपण त्यांना आवर्जून ते पुस्तक वाचायला सांगतो..तसे सांगण्यात अथवा ते पुस्तक भेट देण्यात एक आगळावेगळा आनंद असतो..असेच मला खुपसे भावलेले तसेच डोळ्यात अंजन घालणारे पुस्तक म्हणजे सायन्स ऑफ गेटिंग रिच होय.त्याचे लेखक आहेत वालेस डी वाटल्स..Wallace D Wattles..लेखकाच्या म्हणण्यानुसार श्रीमंत होण्यासाठी एक शास्त्र आहे..विज्ञान आहे..त्यात जसे प्रयोगाअंती अनुमान मांडले जाते त्याचप्रमाणे जर शास्त्रीय दृष्टीकोन आपण ठेवत गेल्यास तसेच काही सूत्रे पाळल्यास गणिती पद्धती प्रमाणे आपण नक्कीच श्रीमंत होऊ शकतो.ज्यांनी सिक्रेट नावाचे पुस्तक वाचले आहे त्यांना हे पुस्तक सहज समजते..हे पुस्तक जणू काही गीता आहे..बायबल आहे..शेवटी काय सर्व पंथ आपल्यला सत्पंथाला नेणारे मार्ग आहेत.

मुख्य म्हणजे १०० वर्षापूर्वी प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे आणि काळाच्या कसोटीवर ते सिद्ध झालेले पुस्तक आहे.अतिशय वास्तववादी दृष्टीकोन त्यातून दिसून येत आहे आणि त्यातून वैयातिक यशाबरोबर आर्थिक साक्षरता शिकवली जाते.नव्या पिढीसाठी हा समृद्धीचा अभिनव मार्ग नक्कीच रोचक असा आहे..असे काही वैश्विक नियम पुस्तकात नमूद केले आहे की ज्यामुळे मनाला भेडसावणारी आर्थिक असुरक्षितता दूर होणार आहे.प्रत्येकाला आपल्यातील पूरक क्षमता ओळखण्यास मदत होणार आहे.आज आपण जे काही समृद्धीसाठी करणार आहोत त्यात नवीन काही नसून पूर्वापार तेच तत्व लागू पडत आहे.त्यासाठी कल्पनात्मक अभिनव विचार प्रक्रिया गरजेची आहे..प्रत्येकाने ठराविक मार्गाचा अवलंब मात्र केला पाहिजे..तुम्ही आज जिथे आहात तिथून सुरुवात करा..भूतकाळ सोडून द्या आणि श्रीमातीकडे वाटचाल असू द्या हे अतिशय सध्या सोप्या भाषेत सांगितले आहे त्यामुळे हे पुस्तक आपल्याला खिळवून ठेवते..आपली इच्छाशक्ती खूप प्रबळ असली पाहिजे.आपण जसा विचार करतो तसेच आपण घडत असतो,,एक विचार्तात्वा जे जळीस्थळी काष्टी आहे..त्यात आपल्या विचारांचे रोपण करा आणि ध्येयापर्यंत पोहोचा..विचारातून आकार साकार होतो.केवळ १०० पानांचे हे पुस्तक असून शेवटी दिलेला सारांशही खूप उपयुक्त आहे.अतिशय उपयुक्त आणि प्रेरणादायी असे हे पुस्तक असून प्रत्येकाने आपल्या घरात अवश्य संग्रही असू द्यावे असे हे पुस्तक आहे..कुठल्याही पानापासून सुरुवात केली तरी हरवल्यासारखे वाटत नाही.

स्वाती पाचपांडे (नाशिक)

52270cookie-check‘द सायन्स ऑफ गेटिंग रिच..’
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.