उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स

udarastha

वैद्य रुपाली पानसे यांनी लिहिलेले सुंदर पुस्तक .पोट, पचन क्रिया , पोटाला कधी आणि काय द्यावं याचं सोप्या भाषेत केलेले विवेचन.आपल्याला आजी , आई कडून कशा बरोबर काय खावं , काय खाऊ नये याची माहिती आलेली असते.पण ते तसं का खाऊ नये , त्याचे काय परिणाम होतात हे रुपाली यांनी भरपूर उदाहरणं देऊन सांगितलं आहे . त्यामुळं आता पर्यंत डोळे झाकून दूध फळं वापरून ज्या smoothies बनवत होते त्या एकदम बंद.:-)

पोटाचा कार्यभाग- शरीरातील दुसरा मेंदू हा लेख पचन क्रिये वर छान माहिती देतो. नाश्त्याचा ऊहापोह हा आणखी एक सुंदर लेख.आपण सरधोपट पणे रोज नाश्ता करत राहतो . पण रात्रीचे जेवण पूर्ण पचलं आहे की नाही, व्यवस्थित भूक लागली आहे की नाही , हे तपासून न पाहताच पोटात नाश्ता टाकणं चुकीचे हे अगदी पटलं. आणि या लेखाच्या अनुषंगाने काही नाश्त्याच्या recipes दिल्या आहेत त्या मस्तच .

हे पुस्तक तुम्हाला पोषण मूल्य, ऋतू आणि आहार, तुमची प्रकृती कशी ओळखावी, किती आणि काय खावं, गोड कधी खावं..आजारपणात काय खावं ..अशा अनेक गोष्टींबाबत माहिती देते.Ready to eat, cornflakes, oats याबाबत सुद्धा डोळे उघडतात . मला वाटतं घरातल्या प्रत्येक सदस्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे .म्हणजे आपण बनवत असलेल्या स्वयंपाकात योग्य ते बदल होऊन उत्तम पोषण मूल्य मिळतील . रुपाली म्हणतात तसं पूरक आहार , व्यायाम, विश्रांती, औषधी ही चतु:सुत्री म्हणजे आयुर्वेदिक जीवनशैली. जी सगळ्यांनी आत्मसात करायला हवी .

After all …You Are What You Eat .

सुचेता मोहिते

65490cookie-checkउदरस्थ नैवेद्य ते चिअर्स
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.