उदरस्थ

udarastha product
डॉक्टर रूपाली पानसें यांनी हे पुस्तक लिहिले आहे. रसिक आंतरभारती या संस्थे ने प्रकाशित केले आहे. पुस्तकाचा विषय आहारशैली आणि आरोग्य या प्रकारात मोडतो. 

वैद्य रुपाली पानसे यांनी, पुणे विद्यापीठाच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून BAMS केले आहे. गेली बरेच वर्ष, त्या आयुर्वेद आणि पंचकर्म याद्वारे रुग्णसेवा करीत आहेत. पुणे विद्यापीठामधे एक आहारशास्त्राचा Post – Graduate कोर्स आहे. या अभ्यासक्रमच्या रचनमंडळात, सल्लागार म्हणून देखील लेखिका काम करतात. रुग्णावर उपचार करताना आहारशैली, मानस रोग आणि lifestyle disease यावर त्यांचा विशेष भर आहे. 

उदर म्हणजे पोट आणि उदरात राहणारा अग्नि म्हणजेच भूक. हि भूक, आयुर्वेदाप्रमाणे,  मानवी शरीराच्या पोषणासाठी आणि वाढीसाठी सर्वात महत्वाची असते म्हणून या पुस्तकाचे नाव उदरस्थ. या अग्नीचे संतुलन बिघडले तर अनेक आजार होऊ शकतात. आयुर्वेद, या पाचकाग्निला इतके महत्व का देतो हे सविस्तर आणि सोप्या भाषेत लेखिकेने समजावून सांगितलेले आहे. 

आपल्या शरीरामधे, एक दुसरा मेंदू असतो,  तो म्हणजे पचनसंस्थेचा. हि पचनसंस्था , स्वयंचलित कार्यप्रणालीच आहे बिलकुल आपल्या मेंदूसारखी. हा  एक महत्वाचा मुद्दा त्या मांड्तात . आपली आतडी किंवा गट याचा आपल्या मनाच्या आरोग्याशी कसा संबंध आहे हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा नक्कीच वाचण्याजोगे आहे. 

त्यांच्या अनुभवातून त्या सांगतात कि आज वैद्यकीय शास्त्रात इतर कुठल्याही व्याधींपेक्षा आहारशैली, जीवनशैली मुळे होण्याऱ्या व्याधी सर्वात जास्त आहेत. 

या पुस्तकामध्ये लेखिका बऱ्याच विषयांना हात घालतात. आहाराची बाराखडी म्हणजे काय? थोडक्यात आहारचे नियम आपल्याला सांगतात. या व्यतिरिक्त,  विरुद्धान्न म्हणजे काय , स्थानिक आणि पारंपरिक पदार्थ हे  खाल्लेच पाहिजेत , पथ्य अन्न ,  पथ्य  का पाळावे ,  पथ्याच्या पदार्थानी यादी, चवीचे सहा रस, पदार्थांची पोषणमूल्ये, त्याचे आरोग्याला फायदे ,  फूड ग्लोबलायझशन मुळे  फास्ट फूड आणि  रेडी  to eat  पदार्थांचा प्रसार  आणि त्यामुळे आरोग्यावर होत असलेला दुष्परिणाम  या सर्व महत्वाच्या विषयांच्या खोलात त्या जातात. भाषा सोपी आणि सर्वसामान्य वाचकांना कळेल अशी आहे. 

लेखिकेने स्थानिक आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन नाश्ता पदार्थांची यादी आणि त्या पदार्थांची कृती देखील या पुस्तकात दिलेली आहे.  काय खावे आणि काय टाळावे हे सांगताना त्यांनी त्यामागचे कारण देखील सांगितल्यामुळे त्या गोष्टी अप्प्ल्याला पटतात. 

 या पुस्तकात सांगितलेले कित्येक मुद्दे आपल्या डोळ्यात अंजन घालयांचे काम करतात. ग्लोबलीझाशन , जाहिराती आणि तांत्रिक प्रगतीमुळे सामान्य माणसाला कित्येक आहारविषयक गोष्टी किंवा पदार्थ आरोग्यासाठी योग्य वाटतात परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे उदारणार्थ शीतपेय का पिऊ नयेत, packaged  फूड किंवा प्रक्रिया केलेलं अन्न का खाऊ नये , त्यामुळे addiction होऊ शकते हे त्या सांगतात. आं तरराष्ट्रीय किंवा काही स्वदेशी कंपन्यादेखील आर्थिक फायद्यासाठी या पदार्थांचे परिणाम  उघडपणे सांगत नाहीत. 

हे  एकप्रकारचे  जनजागृतीचे काम लेखिका या पुस्तकामधून करत आहेत.  प्रत्येक स्त्रीने , बहुधा प्रत्येकाने हे पुस्तक आपल्या आरोग्यासाठी जरूर वाचावे . प्रत्येक (किमान मराठी) घरी हे पुस्तक असावे, असे मला वाटते कारण यामध्ये बऱ्याच गोष्टी अश्या आहेत ज्या वारंवार आपल्याला रेफेरेंस साठी वाचाव्या लागतील मग ते विविध मराठी paramparik पाककृती असो वा पदार्थांची पोषणमूल्ये असो वा विरुद्धानाची उदाहरणे असोत. 

लेखिका वैद्य असल्यामुळे, या पुस्तकात चर्चिल्या गेलेल्या मुद्द्यांचा  पाया आयुर्वेद आहे आणि त्या मुद्द्यांच्या मुळापर्यंत जायचा त्या प्रयत्न त्या करतात.  आणि हेच या  पुस्तकाचे वेगळेपण आहे.

Link to Episode –
https://www.buzzsprout.com/…/8092457-book-review...

द्वितीया सोनावणे
55390cookie-checkउदरस्थ
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.