मानसिक आजारांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप जास्त आहे. दर पाच स्त्रियांपैकी एकीला आणि दर दहा पुरुषांपैकी एकाला आयुष्यात कधीतरी नैराश्य येण्याची शक्यता असते. मृत्यूच्या कारणांपैकी नैराश्य हे आठवं सगळ्यात महत्त्वाचं कारण झालं आहे; इतकं या आजाराचं प्रमाण जास्त आहे. नैराश्य येणं हा स्वतःचं आणि आजूबाजूच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारा आजार आहे. त्यामुळे नैराश्याची सुरुवातीची लक्षणं आणि कारणं यांची सगळ्यांनाच माहिती असायला हवी. वेगवेगळ्या गंभीर आजारांच्या जनजागृती मोहिमा असतात; तशीच नैराश्याबद्दलही असायला हवी. या जनजागृतीमधून काही आपल्याला स्वतःच त्या आजारांचं निदान करायला शिकवलं जात नाही; पण डॉक्टरकडे केव्हा जायचं हे मात्र निश्चिपणे सांगितलं जातं. त्याच प्रमाणे कोणती मानसिक आणि वागण्या-बोलण्यातील क्षणं जाणवली तर मानसोपचातज्ज्ञाकडे जायला हवं हे या पुस्तकात सांगायचा प्रयत्न आहे..
नैराश्याचं योग्य आणि वेळेत निदान होण्यानं पुढचा अनर्थ टाळता येतो. योग्य निदान झालं की योग्य ते वैद्यकीय उपचार आणि मानसोपचार घेता येतात. त्यासाठीच नैराश्य म्हणजे काय ? त्याची लक्षणं काय असतात ? नैराश्यातही काही प्रकार आणि कारणं आहेत का ? नैराश्य ही भावना आणि आजार यांच्यात काय फरक आहे ? मानसोपचारतज्ज्ञाकडे कधी धाव घ्यायला हवी? नैराश्याबरोबर येणारे आणखी कोणते आजार आहेत ? नैराश्याच्या उपचारांचं स्वरूप कसं असतं ? अशा सगळ्या प्रश्नांची सोप्या भाषेत चर्चा करणं आणि त्याचबरोबर नैराश्याबद्दलचे गैरसमज दूर करणं हा या पुस्तकामागचा हेतू आहे.
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole), अमृता देशपांडे (Amruta Deshpande)
Binding : Paperback
ISBN No : 9789391629489
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 290gms
Width : 24.4
Height : 14
Length : 1.7
Edition : 1
Pages : 244