अनेक शतकांपूर्वीपासून माणूस प्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत होता. सुरुवातीला यातून आपल्याला उजेड मिळतो हेच माणसाला कळत होतं. त्यातूनच दिव्यांचा जन्म झाला. ते दिवे कसे होते? त्यातली ज्योत कशी असायची?
ती कशी पेटवली जायची? मेणबत्त्या ते कृत्रिम दिवे (बल्ब) यांचा शोध कसा लागत गेला? हळूहळू प्रकाशाचं विज्ञान कळत गेलं आणि माणसानं आपल्या प्रगतीसाठी प्रकाशाचा वापर करायला सुरुवात केली. त्यातून मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, कॅमेरा, फोटोग्राफर्स, टेलिव्हिजन, लेझर आणि फायबर ऑप्टिक्स यांचा जन्म कसा झाला; तसंच मायक्रोस्कोपचा शोध लागल्यावर अनेक सूक्ष्मजंतूंचा शोध कसा लागला आणि त्यानंतर अनेक आजारांची रहस्य कशी उलगडत गेली; हीच बाब टेलिस्कोपच्या बाबतीतही कशी घडली, या सगळ्याची कहाणी म्हणजे हे पुस्तक.
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)
Binding : Paperback
ISBN No : 9789391629304
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 365gms
Width : 21.5
Height : 14
Length : 3.2
Edition : 1
Pages : 324