'सूक्ष्मजंतू' या विषयावर पुस्तक लिहिणे हे अवघड काम होते; कारण या विषयाचा आवाकाच प्रचंड
आहे. तरीही हे शिवधनुष्य प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांनी लीलया पेलले आहे. जीवाणू तसेच विषाणूंचा शोध, रोगजंतूंचे थैमान आणि त्यांचा मानवी इतिहास व संस्कृतीवर उमटलेला अमीट ठसा, याबद्दल अतिशय रसाळ भाषेतून वाचकांशी संवाद साधतानाच हे पुस्तक आपल्याला उपकारक सूक्ष्मजंतू आणि माणूस यांच्यामधल्या जनुकीय नात्याची सहज सुंदर ओळख करून देते. हे पुस्तक शिक्षक, संशोधक, विद्यार्थी तसेच सर्व वाचकांना अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण आहे.
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)
Binding : Paperback
ISBN No : 9789352202980
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 489gms
Width : 14.2
Height : 2
Length : 21.5
Edition : 1
Pages : 352