दारा शिकोह ! एक सहिष्णू, विद्वान, ज्ञानोपासक विचारवंत आणि या देशाच्या बहुरंगी संस्कृतीचा खरा पाईक ! शांतीचं नंदनवन इथे निर्माण व्हावं म्हणून तो धडपडला, धर्मवेड्यांशी अविरत झुंजला. अखेर या वैचारिक लढ्यात आपले पंचप्राण उधळून गेला. उदार विचारांचं वावडं असलेल्या औरंगजेवाने त्याची हत्या केली. नियतीची एक चाल वाकडी पडली आणि हिंदुस्थानचं नशीब फुटलं. अराजकाच्या उंबरठ्यावर जाऊन तो उभा राहिला. धार्मिक उन्माद आणि विद्वेषाचं भूत आजही आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे. औरंगजेबाच्या प्रदीर्घ राजवटीने हा देश कुठल्याही अर्थाने कधी श्रीमंत झालेला नाही. दारा शिकोह सारख्या शांतिदूताच्या अकस्मिक अंताने मात्र तो निश्चितपणे दरिद्री झाला आहे. विस्मृतीच्या धुळीत गाडल्या गेलेल्या या थोर शहाजाद्याच्या हृदयस्पर्शी जीवनाचा विस्तृत पट मांडणारी ही ऐतिहासिक कहाणी!...
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : काका विधाते ( Kaka Vidhate )
Binding : Hard Cover
ISBN No : 9788187549819
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 908 gms
Width : 21.5
Height : 15.6
Length : 4.5
Edition : 2
Pages : 832
दर्यादिल दारा शिकोह (Daryadil Darashikoh)