Description
थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी “देवयोद्धा”
शहामतपनाह बाजीराव !
साहिबे फुतूहाते उज्जाम बाजीराव!
शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयाचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा!
मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा!
साध्या बारगीर, शिलेदारातून जयवंत सरदार घडवणारा!
हिंदुस्थानात मराठी फौजा तुफानासारख्या नाचवणारा!
दिल्लीवर धडक मारून बादशाही तख्त त्याने हादरवलं.
दख्खनेत दंडेली करणाऱ्या निजामाची नांगी ठेचली.
कोकणात लष्कर घालून सिद्धी आणि फिरंग्यांची कंबरडी मोडली. इंग्रजांना धडकी भरवली.
शत्रूच्या सामर्थ्य नि शक्तीच्या फळ्या फोडून सर्वत्र मराठयांचा दरारा निर्माण केला. केवळ वीस वर्ष्यांच्या मन्वंतर काळात त्याने घडवलं.
बाजीरावाची खरी ओळख समरशास्त्राचा सर्वजाण सेनापती, मराठी साम्राज्याचा निर्माता अशीच आहे. सरकारी दिवाणखान्यात वा माजघरात सापडणारा हा माणूस नाही. रणांगणातच त्याला शोधावं लागेल.
मस्तानी कुंवर हा त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा, पण छोटा घटक.
दोघांचं उत्कट प्रेम संकटांनी विचलित झालं नाही. विरोधकांपुढे वाकलं नाही.
विरहाची वेदना संयमाने सोसून, परस्परांसाठी प्राणाचं मोल देऊन समर्पणाने त्याचा शेवट झाला.
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : काका विधाते ( Kaka Vidhate )
Binding : Paperback
ISBN No : 9788193829332
Language : मराठी ( Marathi )
Pages : 3166 Edition : 1
Weight (gm) : 3089 gms Size : 22*14.5*14