Description
अडीच हजार वर्षांपूर्वीचा भारतवर्ष !
ह्या काळात एक क्रूर घटना नोंदवली गेली. मगधसम्राट बिंबिसाराचा खून त्याच्या स्वतःच्याच मुलाने केला. दानशूर आणि प्रजाप्रेमी असलेल्या बापाला मुलाने हालहाल करून मारून टाकलं. आणि मगध साम्राज्याच्या सिंहासनाला रक्ताभिषेक घालून स्वतः गादीवर बसला. त्या खुनी मुलाचं नाव अजातशत्रू ! ह्यामुळे अजातशत्रूच्या नावासोबत क्रूरकर्मा हा शब्द चिकटला तो कायमचाच.
पण हे वैचित्र्य इथंच थांबलं नाही. पुढे अजातशत्रूच्या मुलानेही सिंहासन बळकावण्यासाठी आपल्या बापाचा बळी घेतला. हे पिढ्यानपिढ्या चालतच राहिलं. अक्षरशः निर्वंश होईपर्यंत..
ही अद्भुत गोष्ट आहे इतिहासाच्या पानांमधून हरवलेल्या एका राजघराण्याच्या अंताची
ह्या विचित्र क्रौर्यमालिकेची सुरुवात कशी झाली ह्याची ही प्राचीन कहाणी.
Additional Information
Publications : कॉस्मिक पब्लिकेशन ( Cosmic Publication )
Author : सुमेधकुमार इंगळे ( Sumedhkumar Ingale )
Binding : Paperback
ISBN No : 9789334130263
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) :850
Width : 14
Height : 3
Length : 22
Edition : 1
Pages : 430
