Description
डॉ. रावसाहेब कसबे हे महाराष्ट्राच्या विचारवंतांतील एक प्रमुख नाव. १९७८ साली त्यांच्या
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना' या ग्रंथाने विचारी वाचकांना एक नवी दृष्टी दिली आणि 'झोत'मुळे एक वैचारिक वादळ निर्माण झाले. ते अद्यापही शमले नाही. १९९४ साली त्यांनी
'हिंदु-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद' हा ग्रंथ लिहन भारतीय राजकारणातील अंतः प्रवाह स्पष्ट करून धार्मिक मूलतत्त्ववादाचे रूप उघडे केले. १९९६ साली त्यांनी लिहिलेल्या 'मानव आणि धर्मचिंतन' या ग्रंथाने मानवजातीच्या उगमापासून ते राज्यसंस्थेच्या निर्मितीपर्यंतची विकासप्रक्रिया विविध ज्ञानशाखांच्या आधारे समजावून सांगितली.
'आंबेडकर आणि मार्क्स' या यांनी १९८५ साली लिहिलेल्या ग्रंथाची ही दुसरी आवृत्ती आहे. या ग्रंथाला त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेत १९९० पासून जागतिक राजकारणात होत असलेले झंझावाती बदल, सोविएत रशियाचे विघटन, समाजवादापुढील आव्हाने आणि जागतिकीकरणाने मानवजातीपुढे उभे राहिलेले प्रश्न यावर महत्त्वपूर्ण भाष्य केलेले असून एकविसाव्या शतकातील नव्या चिंतनाच्या दिशा स्पष्ट केल्या आहेत. म्हणूनच हा ग्रंथ सर्वच प्रागतिक चळवळीतील कार्यकर्त्यांना जसा मार्गदर्शक ठरेल तसाच विचारी वाचकांनाही अंतर्मुख बनवील याबद्दलची खात्री देणारा आहे.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ रावसाहेब कसबे ( Dr Raosaheb Kasabe )
Binding : Paperpack
ISBN No : 9789384914523
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 357
Width : 22
Height : 2
Length : 14
Edition : 03
Pages : 395