Custom Event Setup

×

Click on the elements you want to track as custom events. Selected elements will appear in the list below.

Selected Elements (0)

    केपकॉड (Capecod)

    Rs. 364.00

    Out of stock
    Availability : In StockIn StockOut of stock

    हेन्री डेव्हिड थोरो (१८१७-१८६२) हे एकोणिसाव्या शतकातील महान तत्त्वज्ञ, निसर्गवादी निबंधकार, कवी आणि पर्यावरणवादाचे जनक होते. त्यांच्या 'केपकॉड' या प्रवासवर्णनाचा भगवंत क्षीरसागरांनी केलेला हा अनुवाद आहे. हेन्री डेव्हिड थोरो यांच्या तत्त्वज्ञानाचा आणि आचरणाचा म. गांधी यांच्या विचारांवर आणि जीवनावर फार मोठा प्रभाव होता. गांधीविचार समजून घेण्याच्या दृष्टीने थोरो यांचे वाङ्मय मराठीत येणे गरजेचे आहे. त्यामुळेही 'केपकॉड'चा हा अनुवाद महत्त्वाचा मानावा लागतो.
    थोरोंनी आपल्या वाङ्मयातून आणि चिंतनपर लेखनातून निसर्गाचे एक वेगळेच दर्शन घडवले आहे. मानव आणि निसर्ग यांच्यातील संवादी आणि संघर्षपूर्ण नात्याचा वेध त्यांनी घेतला आहे. निसर्ग जसा स्वाभाविकपणे मानवाचे भरणपोषण करतो तसेच तो तितक्याच स्वाभाविकपणे मानवाचा विनाशही घडवतो. मानवही जसा निसर्गापुढे नतमस्तक होतो तसाच तो निसर्गावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्नही करतो. मानवी जीवन म्हणजे मानव आणि निसर्ग यांच्यातील संवादी आणि संघर्षपूर्ण नात्याची कहाणी. या नात्याचीच एक नाट्यपूर्ण कहाणी थोरोंनी प्रस्तुत पुस्तकात कथन केली आहे. निसर्गासंबंधीचे हे थोरोंचे तत्त्वज्ञान मराठी वाङ्मयाला अनोखे आहे. त्यामुळे केपकॉड मराठीत अनुवादित होणे आवश्यक होते. हा अनुवाद करून भगवंत क्षीरसागरांनी ही उणीव भरून काढली आहे.
    अमेरिकन वाङ्मयात अजोड स्थान असणाऱ्या प्रवासवर्णनाचा अतिशय प्रत्ययकारी अनुवाद भगवंत क्षीरसागरांनी सादर केला आहे. तो नक्कीच मराठी साहित्यात मोलाची भर घालील याचा मला विश्वास वाटतो.

    Publications :  वर्णमुद्रा प्रकाशन (Varnamudra Prakashan)
    Author :  हेन्री डेव्हिड थोरो (Henry David Thoreau)      
    Binding :  Hard Cover
    ISBN No :  9788195061198   
    Language :  मराठी ( Marathi )
    Weight (gm) :  301gms
    Width :  14.6
    Height  :  1.4
    Length  :  22.3
    Edition  : 1
    Pages   :  154

    Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
    January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
    Not enough items available. Only [max] left.
    Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
    Shopping cart

    Your cart is empty.

    Return To Shop

    Add Order Note Edit Order Note
    Add A Coupon

    Add A Coupon

    Coupon code will work on checkout page

    केपकॉड (Capecod)

    Rs. 364.00