Description
एखादे उमदे हरीण-पाडस वनात विहरते आहे; इतक्यात त्याच्या मागे एक शिकारी लागतो. धनुष्य-बाण घेतलेल्या शिकाऱ्याला पाहून ते पाडस घाबरते व जिवाच्या भीतीने धावू लागते. लपण्यासाठी झुडपाचा आधार घेत श्वास घेण्यास थांबते पण जवळ आलेल्या शिकाऱ्याला बघून धावण्याचा प्रयत्न करणार इतक्यात त्याच्या लक्षात येते की त्याची छोटीशी शिंगे फांदीत अडकली आहेत! आता पळणे अशक्य. मृत्यू समोर दिसत आहे. अशा व्याकूळ अवस्थेत ते पाडस ज्या आर्त नजरेने शिकाऱ्याकडे पाहते, ती आर्तता व गळ्यातून निघणारा तो अस्फुट, व्याकुळ सूर म्हणजे गझल !!!
--- उर्दू शायर फ़िराक़ गोरखपुरी
हे वर्णन आपल्या खास शैलीत डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी मंचावरून नेहमी सांगत असत.
Additional Information
Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti )
Author : संगिता जोशी (Sangeeta Joshi )
Binding : Paper Pack
ISBN No : 9788190999380
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 253
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 03
Pages : 228