Description
वाल्मिकी महामुनि हे 'आदिकवि'. त्यांनी रचलेले रामायण हे 'महाकाव्य'. त्याचा नायक श्रीरामचंद्र हा 'मर्यादा पुरुषोत्तम'. त्याचा सेवक श्री हनुमान हा 'चिरंजीव' दासोत्तम. रामाचे राज्य 'आदर्श रामराज्य'. अशा प्रकारे श्रीरामकथा आमच्या भारताच्या दशदिशांमध्ये आज सहस्त्रो वर्षे दुमदुमून राहिली आहे. भारतीय संस्कृति रामरसांत सतत भिजत आलेली आहे. अशी रामकथा गाऊन आपली वाणी पवित्र करावी म्हणून अनेक कवींनी आणि नाटककारांनी आपली प्रतिभा सर्वस्वाने वेचली आहे. परिणामी रामसाहित्याचा हिमालयासारखा उत्तुंग संभार भारतीय साहित्यात डौलाने उभा राहिलेला आहे. रामकथांचे पाठ देणारे पुराणिक, रामकथा गाणारे कीर्तनकार, पिढ्यानपिढ्या भारतीय जनांच्या मनाची मशागत करीत आलेले आहेत. भारतातील सर्व भाषांत रामकथेचे गायन अहोरात्र चालू आहे.
Additional Information
Publications : Publication Division Ministry Of Information And Broadcasting
Author : G.D . Madgulkar ( ग . दि . माडगूळकर )
Binding : Paperback
ISBN No : 9788123019413
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 240
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 1
Pages : 170
