Description
शेतकरी, खी आणि कामगार ही माझ्या दृष्टिकोनातून तीन प्रतीके आहेत. ही प्रतीके कोणत्याही समाजाचे, राष्ट्राचे सार्वकालीन विकासाचे आधारस्तंभ असतात. सर्जनाशी निगडित असलेल्या या तीन प्रतीकांतून भूक, आक्रोश आणि अश्रू हे भाव व्यक्त होत असतात. हे तिन्ही सनातन भाव ज्या साहित्यात असतात ते साहित्य सर्वश्रेष्ठ वास्तववादी स्वरूपाचे मानले पाहिजे. असे साहित्य व्यक्तीला, सामाजाला जगण्याचं बळ देत असतं, ऊर्जा देत असतं, दिशा दाखवित असतं, जीवनावर प्रेम करायला शिकवितं. हे साहित्य वाचकांना अंतर्मुख करून जीवनाचा साक्षात्कार घडवितं. या तिन्ही गोष्टींचे चित्रण प्रा. दिलीप पवार यांच्या ग्रंथात येत असल्यामुळे हा अभ्यास वास्तववादी स्वरूपाचा व सशक्त झाला आहे.
सदर ग्रंथामध्ये कामगार कवितेतील जाणिवांचा आढावा घेताना राजकीय, नैतिक, कला, विज्ञाननिष्ठ, धर्म व तत्त्वज्ञानविषयक सामाजिक जाणिवांचा स्वतंत्रपणे परामर्श घेतला आहे. प्रा. पवार यांनी कामगार साहित्य चळवळीचे स्वरूप विशद करताना कामगार साहित्य संकल्पना, कामगार साहित्य संमेलनांतून आकाराला आलेली साहित्य चळवळ व एकूणच संमेलनांची फलश्रुती यांची चिकित्सक मांडणी केलेली आहे. कामगार कवितेला पाश्चात्य व भारतीय विचारवंतांचे लाभलेले तात्त्विक अधिष्ठान शोधण्याचा केलेला प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण आहे. कामगार कवितेच्या प्रेरणा, स्वरूप, वैशिष्ट्ये आणि वाटचाल यासंबंधीचे विस्तारपूर्वक विवेचन ग्रंथाला उंची प्राप्त करून देते. त्याचबरोबर कामगार कवितेची भाषा यासंबंधी केलेली मीमांसा लक्षणीय स्वरूपाची आहे. माणसाला समृद्ध आणि श्रीमंत करणाऱ्या घाम आणि अश्रू यांचा हा सृजनसोहळा म्हणजे डॉ. दिलीप पवार यांचा हा ग्रंथ होय.
या सर्व दृष्टीने आजपर्यंत अलक्षित असलेल्या विषयावरील हा संदर्भग्रंथ म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ दिलीप पुंडलिक पवार ( Dr Dilip Pundalik Pawar )
Binding : Hard Cover
ISBN No : 9789380166971
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 469
Width : 15
Height : 2
Length : 22
Edition : 01
Pages : 330