Description
साल १९८७. मुंबईत राहणारे आणि सामान्य जीवन जगणारे दोन युवक विष्णुपुराणातील चार युगांच्या चक्रीत सापडतात आणि त्यांचं आयुष्य हे एका स्रोताद्वारे वेगळ्याच अविश्वसनीय जगाला जाऊन भिडतं. विष्णुपुराणातील उल्लेखाप्रमाणे 'सतयुग', 'त्रेतायुग', 'द्वापारयुग' आणि 'कलियुग' असे चार युग मिळून एका 'महायुगा'ची निर्मिती होते.
महायुगाच्या केंद्रबिंदूत हे दोन युवक अशाप्रकारे विलीन होतात, की त्यांची श्रद्धा ह्या जगाच्या अत्युच्च शिखरावर जाऊन पोहोचते आणि त्यांचा; तसेच ह्या महायुग पर्वाचा शेवट एकच ठरतो. काल्पनिक जगाची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगळी असते; पण एखाद्याला हेच काल्पनिक जग व्यक्तिगत आयुष्यात अनुभवायला मिळालं, तर त्याची काय अवस्था होईल? ती व्यक्ती त्या काल्पनिक जगात रमेल का त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल? त्यातून सहज बाहेर पडता आले तर ठीक; पण ते जर अभिमन्यूच्या चक्रव्यूहापेक्षा शंभरपटीने कठीण निघालं तर?
Additional Information
Publications : वाचनवेल प्रतिष्ठान प्रकाशन ( Vachanvel Pratisthan Prakashan )
Author : स्वप्निल सोनवडेकर ( Swapnil Sonavadekar )
Binding : Paperback
ISBN No : 9788198347152
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 249
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 1
Pages : 194