Description
एकूणच बोलीच्या या अभ्यासामध्ये भाषिक आविष्कार आणि समाजव्यवहार यांचा परस्परसंबंध उलगडण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो वेगळा आणि महत्त्वाचा आहे. बहुतांशी भाषिक अभिव्यक्ती ही जीवनसंबद्ध आशय साकार करण्यासाठी झालेली असते. प्रत्यक्ष जीवनव्यवहारातील गरजांनी तिला आकार मिळालेला असतो, हे काही उदाहरणांमधून फार उत्तम प्रकारे व्यक्त झाले आहे. एकूणच हा अभ्यास, मावळी बोलीत व्यक्त झालेले आजवर बाजूला राहिलेले अनुभवविश्व प्रकाशात आणण्याचा प्रयत्न म्हणून महत्त्वाचा आहे. आज तो पुस्तकरूपाने येत आहे, याबद्दल अभ्यासक डॉ. वाघमारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! एक वेगळा विषय घेऊन अभ्यास करण्यास उत्तेजन दिल्याबद्दल त्यांच्या मार्गदर्शक डॉ. विजया देव यांचेही अभिनंदन !
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन ( Prafullata Prakashan )
Author : डॉ अमोल वाघमारे ( Dr Amol Waghmare )
Binding : Paperback
ISBN No : 9788187549703
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 290 gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 02
Pages : 311