आदिवासी, त्यांचे जीवन, प्रश्न आणि संस्कृती या विषयावर डॉ. गोविंद गारे यांची अधिकारवाणी सर्वज्ञात आहे. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. ते एक व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक असून त्यांनी अनेक प्रथितयश ग्रंथांचे संपादन केलेले आहे. डॉ. गारे हे भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त सनदी अधिकारीही आहेत. गेली ४० वर्षे आदिवासींत रमलेल्या या विचारवंत, लेखक, संशोधक, साहित्यिक आणि प्रशासकाने आदिवासींच्या प्रश्नांवर आणि जीवनावर विविध प्रकारचे अमाप लेखन केले आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांना महाराष्ट्र राज्य मराठी वाङ्मय उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीची व मराठी समाजशास्त्र परिषदेची पारितोषिके मिळाली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील 'आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे' ते जनक म्हणून ओळखले जातात. 'शिवनेरी भूषण', 'आदिवासी भूषण' यासारखे पुरस्कार त्यांनी आदिवासी समाजासाठी वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत केलेल्या भरीव योगदानामुळे त्यांना देण्यात आलेले आहेत.
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ गोविंद गारे ( Dr Govind Gare )
Binding : Paperpack
ISBN No : 8186182942
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 104
Width : 22
Height : 1
Length : 14
Edition : 02
Pages : 103
नक्षलवादी आणि आदिवासी ( Nakshalwadi Aani Aadiwasi )