Description
भारत देशाला आणि त्यातही आपल्या महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभलेली आहे. नवव्या शतकात नवनाथांपासून नाथपंथाचा उदय झाला. 'अलक्षाला लक्षून मोक्षमार्गाकडे वाटचाल' करणाऱ्या प्रत्येकाला येथे बिनशर्त प्रवेश आहे.तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर माउली होऊन गेले. नाथपंथाची दीक्षा घेतलेल्या माउलींनी सर्वसामान्यांना आणि बहुजनांना सामावून घेणाऱ्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला.नाथयोगी ही कथा, एका दैवी बालकाचा विसाव्या शतकात जन्म झाल्यावर, नाथांची आणि वारकऱ्यांची परंपरा पुढे नेण्यासाठी, त्याच्या जीवनात अनेक अद्भुत, अनाकलनीय, अतर्क्स घटना घडत गेल्या ह्यावर आधारित आहे. वारकरी आणि नाथसंप्रदायाच्या तत्वज्ञानातील काही विशेष गोष्टींचे प्रकटीकरण, जे आताच्या येणाऱ्या कठिण काळानुसार गरजेचे आहे. त्यावरील प्रबोधन साध्या सोप्या रितीनी सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे. सर्वच संत सामान्यांच्यात जन्म घेतात, सामान्यांसारखे जगतात परंतु असामान्य परमेश्वरीय कार्य करतात ह्याची प्रचिती ह्या कथेतून नक्कीच येईल. परमेश्वराची प्राप्ती व आनंदी जीवनासाठी, वारकरी व नाथ संप्रदायाच्या संतांनी सांगितलेले सर्वात सोपे साधन म्हणजे त्याचाच होऊन, त्याच्या इच्छेने राहणे हे एक परमसत्य ह्या कथेतून उलगडत जाते.
( * Handling charges 50/- Rs included in cost, Ships in 3 to 5 days )
Additional Information
Publications : रसिक आंतरभारती(Rasik Antarbharti )
Author : सखाराम आठवले ( Sakharam Athawale )
Binding : Paperpack
ISBN No : 9788197075858
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 436 gms
Width : 14
Height : 3
Length : 22
Edition : 01
Pages : 410
