Description
छत्रपती शिवाजीमहाराज हे आम मराठी जनतेचे आराध्यदैवत आहे. तेव्हा महाराजांची जेवढी चरित्रे प्रकाशित होतील तेवढी हवीच आहेत. परंतु दर्दैवाने अद्यापही मराठी भाषेतील शिवचरित्राची संख्या फारच थोडी आहे. आम्ही प्रकाशित करीत असलेल्या या शिवचरित्राने त्यात एकाची भर पडत आहेच. शिवाय, खऱ्या इतिहास - संशोधकाला साजेश्या तटस्थ वृत्तीने लिहिलेले हे एक नमुनेदार शिवचरित्र होय. लेखकाने तथाकथित 'संशोधनात्मक स्वातंत्र्य' न घेतल्यामुळे या शिवचरित्राला कपोलकल्पित कादंबरीचे स्वरूप न येत, हा एक विश्वसनीय ग्रंथराज झालेला आहे.
तसेच, हे एका इतिहास - संशोधकाने लिहिलेले साधार शिवचरित्र असले तरी ते केवळ संशोधकांसाठी लिहिलेले आहे असे मात्र नाही. कोणाहि सामान्य वाचकाला सहज समजू शकेल अशा भाषेत ते लिहिलेले आहे आणि म्हणूनच अनेक वृत्तपत्रांनी त्याचे भरपूर कौतुकही केले आहे. गेली अनेक वर्ष मागणी असूनही हे चरित्र बाजारात उपलब्ध नव्हते. वाचक त्याच्या या नव्या आवृत्तीचे पूर्वीप्रमाणेच स्वागत करतील अशी खात्री आहे.
Note : Cost includes 200 Rs handling charges
Additional Information
Publications : डायमंड पब्लिकेशन ( Diamond Publication )
Author : गजानन भास्कर मेहेंदळे ( Gajanan Bhaskar Mehendale )
Binding : HardCover
ISBN No :
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 3663 gms
Width : 14
Height : 6
Length : 22
Edition : 6
Pages : 2432
