Description
श्रीकृष्ण जिथे जिथे राहिले, त्याचा नकाशासहित आलेख या पुस्तकात आहे. त्या ठिकाणी लेखिकेने भेटी दिल्या आहेत. काही ठिकाणी जाणे, अतिशय अवघड आहे. जिथे माणसे पोहोचू शकत नाही, तिथे लेखिका गेल्या आहेत; याचे आश्चर्य वाटते. भटकणे सगळ्यांनाच आवडते; परंतु अभ्यासासाठी भटकणे हे व्रत आहे. हे श्रीकृष्णव्रत लेखिकेने चोख केले आहे. त्याची परिणती म्हणून हा ग्रंथप्रसाद आपल्याला मिळतो आहे. महाभारतीय युद्ध ज्या भूमीवर घडले, त्याचा नकाशा या पुस्तकात दिला आहे.
या भूमीवर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. श्रीकृष्णाच्या उपदेशाने अर्जुनाचा मोह नाहिसा झाला. त्याला स्वकर्तव्याची जाणीव झाली. भगवान श्रीकृष्णांचे बोल म्हणजे, काळ आणि मानवीजीवन यांना जोडणारा पूल आहे. त्यांना काळ ठाऊक होता. अवकाश त्यांचा होता. खरेतर, तेच विश्व होते. या सगळ्या जाणिवा श्रीकृष्णांच्या स्थलवर्णनातून येतात. हे स्थलवर्णन वाचताना आपण त्या ठिकाणी जातो. हे प्रवासी गाईड नाही. या संपूर्ण वर्णनाला सोज्ज्वळ भक्तीचा रसस्पर्श आहे. त्यामुळे या वर्णनात लेखिकेला आलेले त्या त्या ठिकाणचे अनुभव, सहज लिहिले आहेत. जे काय जाणवले, ते स्पष्ट आहे. हातचे राखून काहीही ठेवले नाही. ही स्थलवर्णने वाचताना हाताच्या बोटाला धरून आपल्याला अनामशक्ती पुढे नेत आहे, असे वाटते.
'श्रीकृष्ण स्थलयात्रा' हे पुस्तक वाचनीय आहे. काही माहिती नवीन आहे. यात पौराणिक आणि ऐतिहासिक कथांचा गोफ गुंफला आहे. काही ठिकाणी लेखिकेचे मन भारावते, तर काही ठिकाणी मन मौनात जाते.
काही ठिकाणी मन थक्क होते. श्रीकृष्णांनी हा सारा प्रवास त्या वेळी कसा काय केला ! पांडवही किती फिरले! यातून जे जीवनाचे समग्र भान येते, ते महत्त्वाचे आहे. या यात्रेत कोणताही वाचक सहज सहभागी होईल.
वाचक यात्रिक या पुस्तकाला नक्की दाद देईल. त्याला ही स्थलयात्रा अनुभवायला आवडेल.
-- डॉ. यशवंत पाठक
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन ( Prafullata Prakashan )
Author : गीता आदिनाथ हरवंदे
( Geeta Adinath Harvande )
Binding : Paperback
ISBN No : 9788187549543
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 315 gms
Width : 14
Height : 2.5
Length : 22
Edition : 02
Pages : 285