Description
दहा लाख छापील प्रतींहून जास्त विक्री झालेलं पुस्तक
आजच्या शेअरबाजारासाठी ग्रॅहमच्या चिरकालीन संकल्पनांची अद्ययावत टिपण्यांसह मांडणी
विसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमन जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. १९४९ सालापासून हे पुस्तक 'शेअरबाजारामधल्या गुंतवणुकीसाठीचं बायबल' म्हणून ओळखलं जातं. यात ग्रॅहॅमनं गुंतवणूकदारांचं कमालीचं नुकसान होऊ नये यासाठी 'व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग'ची संकल्पना कशी वापरायची याचं विवेचन केलं आहे. ग्रॅहॅमच्या धोरणांमधल्या चातुर्याचा अनुभव शेअरबाजारातील गेल्या अनेक वर्षांमधल्या घडामोडींदरम्यान आलेलाच आहे. ग्रॅहॅमच्या मूळ लिखाणाला धक्का न लावता अर्थक्षेत्रामधला मान्यवर पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेसन इवाईग यांची अद्ययावत टिप्पणी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. यामुळे आजच्या शेअरबाजाराशी सुसंगत असलेल्या मुद्द्यांनाही हे पुस्तक स्पर्श करतं. तसंच ग्रॅहॅमनं दिलेली मूळ उदाहरणं आणि आजच्या आर्थिक विषयांबद्दलचे मथळे यांच्यामधलं साम्यही अधोरेखित होतं. तसंच ग्रॅहॅमच्या तत्त्वांचा नेमका कसा वापर करायचा याची आणखी सखोल जाण वाचकांना लाभते. आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठायची याविषयीचं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि अजोड पुस्तक आहे.
Additional Information
Publications : मनोविकास प्रकाशन (Manovikas Prakashan)
Author : अतुल कहाते (Atul Kahate)
Binding : Paperback
ISBN No : 9789390060146
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 453gms
Width : 14.1
Height : 2.2
Length : 21.3
Edition : 1
Pages : 468