Description
नागालँड आणि अरुणाचलसारख्या अनवट प्रदेशात आदिवासी ज्ञानाचा अभ्यास आणि त्यांचा जंगल वाचविण्यासाठी आज काय उपयोग होईल यावर संशोधन करण्यासाठी अर्चना जगदीश यांनी चार पाच वर्षे नागालँडमध्ये काम केलं, तिथल्या आदिवासी जमातींना समजून घेत संशोधन केलं आणि शिदोरी जमा झालेली असताना, कोणताही तज्ज्ञपणाचा आव न आणता आपले भटकंतीचे अनुभव आणि अनोख्या गोष्टी या पुस्तकात सांगितल्या आहेत. यातून अशा संशोधनातील आव्हाने, धडपड आणि या प्रदेशाची पर्यटना पलिकडची माहिती, अनुभव आपल्या थेट नागालँडमध्ये घेऊन जातात. नागा आदिवासींचं जीवन आणि त्यांचा स्वभाव, खुलेपणा या सहज सांगितलेल्या गोष्टीतून तंतोतंत डोळ्यासमोर उभ्या राहतात. अस्सल अनुभवावर आधारित असलेला हा नागालँड आणि ईशान्य भारताचा फेरफटका वाचकांना नक्की आवडेल, कारण ही पर्यटन माहिती पुस्तिका नाही किंवा गुगल आधारित माहितीचा भरणा नाही...
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : अर्चना जगदीप ( Archana Jagdip)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549857
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 261gms
Width : 21.4
Height : 13.9
Length : 1.1
Edition : 1
Pages : 200