अध्यात्म किंवा अध्यात्मशास्त्र म्हणजे उत्तम, दर्जेदार, समाधानी व आनंदी जीवन जगण्याची आणि आपण मृत्यूकडे जात नसून चैतन्याच्या गावचे कायमचे रहिवासी आहोत असे संस्कार मनावर करण्याची पद्धती होय असे मला वाटते. असे हे आध्यात्मिक जीवन कसे जगावे यासाठी अनेक धर्मांतील साधुसंतांनी अखिल विश्वाला मार्गदर्शन केले आहे. आपले चैतन्य, आपले मन आणि आपली बुद्धी ह्या आपल्याला न दिसणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्यांचीच या आध्यात्मिक जीवनात खूप महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसून येते. या अदृश्य गोष्टींचे कार्य कसे चालते? हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपल्याला समजले तर आपल्या जीवनातील परम आध्यात्मिक उद्दिष्ट आपण सहज पार पाडू शकू. यासाठी गेल्याच शतकात विकसित झालेली क्वान्टम मेकॅनिक्स ही विज्ञानशाखा आपल्याला साहाय्यभूत होत असल्याचे सुस्पष्टपणे दिसून येते आणि अशा रीतीने क्वान्टमशास्त्राचे विज्ञानरूपी भक्कम असे अधिष्ठान आपल्या अध्यात्मशास्त्राला लाभले आहे. अशा या अध्यात्म आणि विज्ञान यांच्या संगमावर उभे राहून आपल्या जीवनाचे समग्र वैज्ञानिक दर्शन घेता घेता सहजच आपल्या चिरंतन अस्तित्त्वाचा वेध घेण्यासाठी असे हे क्वान्टम शास्त्र आपल्याला परम साहाय्यकारी झालेले आहे.
मानवाला त्याच्या सर्वोच्च पातळीवरून अखिल विश्वाबद्दल उत्स्फूर्ततेने विचार करावयाला लावणारे एक महत्त्वाचे पुस्तक. "
Book Name : क्वान्टम मेकॅनिक्स (Quantam Mechanics)
Publication : मल्टिव्हर्सिटी प्रकाशन(Multiversity Publication)
Author : राजेश भुतकर (Rajesh Bhuthkar)
Language : मराठी ( Marathi )
Weight : 560gms
Binding : Paperback
ISBN No : 9789387595194
Pages : 485
Edition : 1
Width : 21.7
Height : 14.1
Length : 2.3